शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव!
2
टाईम मॅगझीनच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत एकही भारतीय नाही, ट्रम्प-युनूस यांचा समावेश; असं आहे कारण
3
"तुम्ही मुख्यमंत्री असताना झोपला होतात का?" 'त्या' मागणीवरून गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
4
"तिच्या अंगाची दुर्गंधी येते"; प्रतिस्पर्ध्याला वापरण्यास सांगितले डीओ; टेनिसमधला अजब प्रकार
5
बाबा रामदेव यांच्या पतंजलीची अदार पूनावाला यांच्या कंपनीसोबत मोठी डिल; नवीन क्षेत्रात उडी
6
हो, मलाही शिंदेंच्या शिवसेनेत सहभागासाठी ऑफर; खासदार राजाभाऊ वाजे यांचा गौप्यस्फोट
7
३ दिवस खोलीत सडत राहिली काजोलच्या आजीची डेडबॉडी, ८४व्या वर्षी झाला दुर्देवी अंत
8
Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात, Nifty ६० अंकांनी घसरला; IT Stocks आपटले
9
"बंगाली हिंदू बेघर, छावण्यांमध्ये खिचडी खातायत...!"; प. बंगालमधील हिंसाचारावरून मिथुन यांचा ममतांवर प्रहार, म्हणाले...
10
कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार, श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णीचाही होणार सन्मान
11
IPL 2025: "पराभवास मीच जबाबदार, मी चुकीचा शॉट खेळलो"; अजिंक्य रहाणे पराभवानंतर निराश
12
४३ कोटींचं अपार्टमेंट, २६ लाखांचं गोल्फ किट... कोण आहेत अनमोल सिंग जग्गी? SEBI नं कंपनीवर केली कारवाई
13
"तेव्हा सेन्सॉर बोर्ड म्हणालं मोदींनी जातीव्यवस्था नष्ट केलीय", 'फुले' सिनेमाच्या वादावर अनुराग कश्यप स्पष्टच बोलला
14
ठाणे : बाल आश्रमात २ मुलींवर अत्याचार, २९ पीडित मुलांची केली सुटका; संचालकासह पाच जणांवर गुन्हा
15
आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी
16
बँकांनी १६ लाख कोटी रुपयांवर सोडले पाणी; मोठमोठी कर्जे बुडीत खात्यात, पहिल्या क्रमांकावर कोणती बँक?
17
विशेष लेख: राहुल गांधी म्हणतात, ‘वाट बघेन! मला घाई नाही!’
18
एसटीच्या सवलतींचा महाराष्ट्रातील १८१ कोटी प्रवाशांना लाभ, ६,४९५ कोटींची सवलत; महामंडळाची माहिती
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२५: प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, एखादी आनंददायी बातमी मिळेल
20
युद्ध फायद्याचे? सेन्सेक्स ७७ हजारांवर, परदेशी गुंतवणूकदारांकडून देशात पैसे गुंतवणे सुरू

ड्रग्जचा ११ किलो कच्चा माल जप्त; पाच आरोपी कोठडीत

By राजकुमार जोंधळे | Updated: April 9, 2025 20:18 IST

अमली पदार्थ नियंत्रण शाखेची कारवाई : एक आरोपी चाकूर तालुक्यातील

राजकुमार जाेंधळे, लातूर :  मुंबईत वास्तव्याला असलेल्या पाच जणांनी ड्रग्जचा कच्चा माल आणून तो रोहिणा (ता. चाकूर) परिसरातील त्यांच्यापैकी एकाच्या शेतात मिक्सिंग करण्याची यंत्रणा उभारली होती. ती उद्ध्वस्त करीत एनसीबी-पोलिसांनी पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. हे सर्व जण मुंबईतच ड्रग्ज विक्री करीत असून, कारवाईदरम्यान तपास यंत्रणेने ड्रग्जचा ११ किलो कच्चा माल जप्त केला.

मुंबईतील एका ड्रग्ज प्रकरणात पुणे येथील पथक एका संशयिताच्या शोधात रोहिणा परिसरात गेले होते. या प्रकरणातील पाच आरोपींपैकी एकाचे मूळ गाव चाकूर तालुक्यातील असल्याची माहिती यंत्रणेकडे होती. दरम्यान, शेतात एका शेडमध्ये ड्रग्जचा कच्चा माल आणून गुपचूपपणे तो मिक्स करून पुन्हा मुंबईकडे पोहोचविण्याचा इरादा असल्याचा अंदाज आहे. तिथे धाड टाकल्यानंतर ११ किलो कच्चा माल हाती लागला असून, पाच जणांना अटक केली.

पाच जणांना चाकूर न्यायालयात केले हजर...

प्रमोद संजीव केंद्रे (वय ३५ रा. राेहिणा ता. चाकूर), महमद कलीम शेख (रा. गोळीबार रोड, मुंबई), जुबेर हसन मापकर (५२ रा. राेहा जि. रायगड), आहाद मेमन (रा. डाेंगरी, मुंबई), अहमद अस्लम खान (रा. मुंबई) यांना चाकूर न्यायालयात बुधवारी हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी मिळाली.

निसटण्याचा डाव फसला...

ड्रग्ज प्रकरणाच्या तपासासाठी चाकूर तालुक्यात पथक आले होते. कार (एमएच २४ एलबी १८९२) मध्ये बसून ते चाकूरहून लातूरकडे जाताना कारमधील आहाद अल्ताफखान ऊर्फ आहाद शफिक मेमन (रा. मुंबई) याने जाणीवपूर्वक कारचालकाच्या हातातील स्टेअरिंग उलटे फिरविले. कार उलटली. त्यात अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. मुंबई (डोंगरी) येथील आरोपीसोबतच चाकूर तालुक्यातील एक जण आणि अन्य तिघे, अशा एकूण पाच जणांची चौकशी सुरू आहे.

ड्रग्जची किंमत किती?

शेतातील शेडमध्ये हस्तगत केलेला ड्रग्जचा कच्चा माल आहे. त्याची नेमकी किंमत किती, हे कळू शकले नाही. कच्च्या मालाचे नमुने लॅबला पाठविले जातील. त्यानंतर मुंबई-पुण्यातील अमली पदार्थ नियंत्रण शाखा त्याचे मूल्य सांगू शकेल. ड्रग्जचा हा बाजार मुंबईतील असून, आरोपी सध्या मुंबईतच वास्तव्याला आहेत. त्यातील एक मूळचा चाकूर तालुक्यातील असल्याने पुण्यातील पथक मागील आठवड्यात चौकशीसाठी जिल्ह्यात आले होते. दरम्यान, मंगळवारच्या अपघातामुळे ड्रग्ज प्रकरणाचा उलगडा झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी