लातूर : सातारा जिल्ह्यातील कराड आगाराची बस अंबाजोगाई रोडवरील लातूर बसस्थानकात पार्किंग केली असता बसच्या टाकीतील अंदाजे ११० लिटर डिझेलची चोरी झाल्याची घटना घटना घडली. याबाबत बस चालक प्रमोद विश्वनाथ कदम यांनी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड आगाराचे बस चालक प्रमोद विश्वनाथ कदम यांनी आपल्या ताब्यातील एम.एच.१४ बी.टी. ०५९० या क्रमांकाची बस लातुरातील बस स्थानक क्रमांक दोन (अंबाजोगाई रोड) येथे २८ ऑगस्ट रोजी पार्किंग केली होती. त्यानंतर ते बस मध्येच आराम साठी थांबले होते.
यादरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने गाडीच्या टाकीतून अंदाज एकशे दहा लिटर,११ हजार रुपयांचे डिझेल चोरले आणि तिथून पळ काढला. याबाबत प्रमोद कदम यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भताने करीत आहेत.