तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या एकूण २२८ सदस्यांसाठी ६०५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र सादर केले होते. छाननीत गव्हाण, व्हटी सायगाव येथील प्रत्येकी एक अर्ज अवैध ठरला हाेता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १२१ जणांनी तर त्यापूर्वी दोघांनी अशा एकूण १२३ जणांनी माघार घेतली. त्यामुळे तालुक्यातील एकमेव फावडेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे. सध्या ४८२ उमेदवार रिंगणात आहेत.
ग्रामपंचायतनिहाय अर्ज मागे घेतलेल्यांची संख्या...
माटेगाव-१, दिवेगाव- ३, सिंदगाव- ७, वाला- ६, गव्हाण- ८, खानापूर- १, कुंभारवाडी- १३, पळशी- ३, माकेगाव- ४, फरदपूर- ७, बिटरगाव- ७, बावची- २, भंडारवाडी- ७, खरोळा- ६, तळणी- ६, तत्तापूर- ६, पाथरवाडी- २, मुसळेवाडी- ५, मोरवड- ३, आनंदवाडी- ३, वंजारवाडी- १, व्हटी सायगाव- ३, सारोळा- ४, कुंभारी- ९, खलंग्री- ४, फावडेवाडी- २ अशा एकूण १२३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर फावडेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राहुल पाटील, निवडणूक नायब तहसीलदार गोविंद येरमे यांनी दिली.