नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सूचनेनुसार प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे. प्रतिबंधात्मक आदेशपरीक्षेच्या अनुषंगाने सर्व ३१ उपकेंद्राच्या परिसरात असेल. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याप्रमाणे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये परीक्षा उपकेंद्राच्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेला आहे. कोविड-१९च्या अनुषंगाने दक्षता घेतली आहे. यामध्ये उमेदवारांची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी संपूर्ण उपकेंद्रावरील स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, प्रत्येक उमेदवाराला किट तसेच पर्यवेक्षणाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी प्रोटेक्ट कीट देण्यात येणार आहे.
उमेदवारांसाठी या आहेत सूचना....
परीक्षेच्या वेळी आयोगाच्या प्रवेश प्रमाणपत्राव्यतिरिक्त ओळखीच्या पुराव्यासाठी उमेदवाराने खालीलपैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच स्वतःचे मूळ आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पॅनकार्ड, फक्त स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट संबंधित ओळखपत्राची प्रत्येक सत्रासाठी स्वसाक्षांकित छायांकित प्रत परीक्षेसाठी सोबत आणणे अनिवार्य आहे.
हे साहित्य उपकेंद्रावर बाळगण्यास मनाई...
स्माट्र वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाइल फोन, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लुटूथ, दूरसंचार साधने म्हणून वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वह्या, नोटस, परवानगी नसलेली पुस्तके, बॅग्ज, पॅड, पाऊच, कॅलक्युलेटर, इ.प्रकारची साधने / साहित्य परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वत:जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे.