लातूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धा सुरू असून, या स्पर्धेतील पहिल्या फेरीचे मूल्यांकन झाले असून, या मूल्यांकनामध्ये २२ पैकी १४ बसस्थानकांना ५० पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाला ६८, जुन्या रेल्वे स्टेशननजीक असलेल्या बसस्थानकाला ४२ तर अंबाजोगाई रोडवरील नवीन बसस्थानकाला ७१ गुण मिळाले आहेत. १ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२४ पर्यंत या अभियानाचा कालावधी आहे. प्राथमिक फेरीत ५० पेक्षा कमी गुण असणाऱ्या बसस्थानकांची संख्या १४ आहे.
अहमदपूर, चाकूर, शिरूर ताजबंद, देवणी, हाळी हंडरगुळी, जळकोट, उदगीर, औसा, लामजना, औराद, कषासारशिरसी, निलंगा, शिरूर अनंतपाळ, किनगाव, लातूर शहरातील जुने मध्यवर्ती, रेल्वे स्टेशन परिसर आणि अंबाजोगाई रोडवरील बसस्थानक तसेच मुरुड, नालेगाव, पानगाव, रेणापूर, तांदुळजा आदी २२ बसस्थानक स्पर्धेत आहेत.
बसस्थानक परिसर व शौचालयाला ५० गुणबसस्थानक परिसर व शौचालयाला ५० गुण तर बसस्थानकातील स्वच्छतेला २५ गुण आहेत. प्रवाशांसोबत असलेल्या सौहार्द वागणुकीला २५ गुण आहेत. सरासरी १०० गुणांसाठी ही स्पर्धा आहे. त्यात पहिल्या फेरीत ५० पेक्षा कमी गुण मिळालेल्या बसस्थानकांमध्ये १४ बसस्थानके आहेत. शिरूर ताजबंद ४८, देवणी २०, हाळी हंडरगुळी ३८, जळकोट ३९, उदगीर १५, औसा ३७, औराद ३८, कासारशिरसी ३, लातूर जुने रेल्वे स्टेशन ३, मुरुड ३७, नालेगाव ४६, पानगाव ०, रेणापूर ४३ आणि तांदुळजा बसस्थानकाला फक्त २ गुण मिळाले आहेत.
५० पेक्षा जास्त गुण असलेले बसस्थानकअहमदपूर ५४, चाकूर ५०, लामजना ७०, निलंगा ६५, शिरूर अनंतपाळ ५७, किनगाव ५६, लातूर मध्यवर्ती बसस्थानक ६८, लातूर-३ नवीन ७१ या ९ बसस्थानकांचा समावेश आहे.
बसस्थानक वर्गवारी बसस्थानक शौचालय बस स्वच्छता प्रवासी अभियान सरासरी गुणअहमदपूर अ ३५ १२ ०७ ५४चाकूर क २८ ११ ११ ५०शिरूर ताजबंद अ २९ १० ०९ ४८देवणी क ०७ ०९ ०४ २०हाळी हंडरगुळी क २३ ०९ ०६ ३८जळकोट क २३ १० ०६ ३९उदगीर अ ०२ ०९ ०४ १५औसा अ १९ १२ ०७ ३७लामजना क ४२ १२ १६ ७०कासारशिरसी क. ०२ ०१ ०० ०३निलंगा अ ४० १२ १४ ६५शिरूर अनंतपाळ ३४ १० १३ ५७किनगाव क ३२ १२ १२ ५६लातूर जुने अ ४१ ०९ १८ ६८लातूर २ जुने क १६ ०५ १९ ३१लातूर नवीन ब ४५ ०९ १७ ७१मुरुड अ १६ ०९ १२ ३७नालेगाव क ३१ ०९ ०६ ४६पानगाव क ०० ०० ०० ००रेणापूर क ३० ०५ ०८ ४३तांदुळजा क २ ०० ०० ०२