शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

लातूर जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवरील पिके मातीमोल; फळबागांना सर्वाधिक फटका

By संदीप शिंदे | Published: May 05, 2023 8:28 PM

प्रशासनाकडून आतापर्यंत ८७७ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

लातूर : शेतकऱ्यांच्या पाठीमागील संकटाची मालिका पाठलाग सोडायला तयार नसल्याची स्थिती आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी व रोगराईने सोयाबीनसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात चांगले उत्पादन हाती लागेल, अशी आशा होती. मात्र, मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्याची मदत मिळते ना मिळते तोच एप्रिल महिन्यातही अवकाळीने दीड हजार हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत.

खरीप हंगामात अतिवृष्टी, गोगलगाय, यलोमोझॅकने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले गेले. खरिपातील अन्य पिकांतूनही म्हणावे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही. गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने प्रकल्प, तलाव ओसंडून वाहिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. रब्बी हंगामातील पिकांतून चांगले उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडेल, अशी आशा होती. पिकेही जोरदार आली. मात्र, गहू, ज्वारी, हरभरा काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट कोसळले. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळीने गहू, ज्वारी, हरभरा, करडई, टरबूज, खरबूज, पपई, द्राक्ष, आंबे यासह भाजीपाल्यांचे नुकसान झाले. राज्य शासनाकडून नुकसानभरपाईपोटी १० कोटी रुपये मिळाले. ही रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडते ना पडते तोच एप्रिल महिन्यातही अवकाळीने हजेरी लावली. यात जिल्ह्यातील ३ हजार ४५ शेतकऱ्यांच्या शेतातील १ हजार ४७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. दरम्यान, प्रशासनाकडून आतापर्यंत ८७७ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

अवकाळीमुळे १९६ गावांत नुकसान...जिल्ह्यात १ ते ३० एप्रिलदरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीने १९६ गावांतील ३ हजार ४५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात जिरायती क्षेत्रावरील २९९ हेक्टर, बागायती ४२२ हेक्टर तर ७४८ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. यात लातूर वगळता औसा, रेणापूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर व चाकूर तालुक्यातील गावांत नुकसान झाले आहे.

८७७ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण...जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे गतीने करण्यात येत असून, आतापर्यंत १ हजार ९५२ बाधित शेतकऱ्यांच्या ८७७ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात जिरायती २३७ हेक्टर, बागायती २७० तर फळपिकांवरील ३६९ हेक्टरवरील पंचनामे झाले आहेत. प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण झाल्यावर एकूण मदतीची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. मार्चमधील नुकसानीचे पंचनामे करून तातडीने दहा कोटींची मदत मिळाली होती. त्याचप्रमाणे आताही पंचनामे पूर्ण करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

तहसीलनिहाय बाधित क्षेत्र...तालुका             बाधित संख्या             बाधित क्षेत्रऔसा             ५६                         ४९ (हेक्टर)रेणापूर             १८७             ९७निलंगा             ७७०             २३५शि.अनंत             ४७८             २८३देवणी             १७४                        ५६उदगीर             २९८             १४९जळकोट             ६८४             २९४अहमदपूर             ३३१             २४५चाकूर             ७७             ६०एकूण             ३०४५             १४७०

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेतीlaturलातूर