शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

लातूर जिल्ह्यात रोहयोतून ४३० गावांतील १५ हजार मजूरांच्या हाताला काम !

By संदीप शिंदे | Published: March 11, 2023 7:04 PM

जिल्ह्यातील ३५६ गावांना कामांची प्रतीक्षा

लातूर : बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात ७८६ ग्रामपंचायती असून, यातील ४३० गावांमध्ये १ हजार ९३२ कामे सुरु असून, या कामांवर १५ हजार २९३ मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे. तर जिल्ह्यातील ३५६ ग्रामपंचायतींना रोहयोच्या कामांची प्रतीक्षा लागली आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी शासनाच्या वतीने ॲपवर ऑनलाईन हजेरीची पद्धत राबविली जात आहे. यामध्ये सकाळ आणि सांयकाळच्या सत्रात मजूरांच्या प्रत्यक्ष कामाच्या स्थळावर जावून हजेरी घेण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात ४३० गावांमध्ये १ हजार ९३२ कामे सुरु आहेत. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर १४०१ कामे सुरु असून, ११ हजार ६१४ मजूर कार्यरत आहेत. तसेच कृषि विभागाच्या २३३ कामांवर ९१९, वन विभाग ९० कामांवर १ हजार ६६ मजूर, रेशीम विभागाच्या ८८ कामांवर ३३१, सामाजिक वनीकरण ९५ कामांवर ६५८ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २५ कामांवर ७९५ मजूर कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ५४ टक्के ग्रामपंचायतीमध्ये कामे सूरु असली तरी उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरु करण्यासाठी रोजगार हमी योजना विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक कामे सुरु...जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक १ हजार ४०१ कामे सुरु आहेत. यामध्ये ११ हजार ६१४ मजूर कार्यरत आहेत. तसेच अहमदपूर तालुक्यात २१५ कामांवर १३०७, औसा २४३ कामांवर २५५०, चाकूर ८२ कामांवर ६३१, देवणी ७६ कामे ११३६, जळकोट ८३ कामे ४९३, लातूर १२२ कामे ६४४, निलंगा ८४ कामे ७१०, रेणापूर १५१ कामे १६३९, शिरुर अनंतपाळ ३८ कामे २४९ तर उदगीर तालुक्यात ३०७ कामांवर २२३५ मजूर कार्यरत आहेत.

ऑनलाईन हजेरीमुळे कामांत पारदर्शकता...रोजगार हमी योजनेच्या कामांवर हजर मजूरांची सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात ऑनलाईन हजेरी घेण्यात येत आहे. याबाबत शासनस्तरावरुन निर्णय घेण्यात आलेला आहे. रोहयोच्या कामांमध्ये पारदर्शकता यावी, हा त्यामागचा उद्देश असून, रोजगार सेवकांकडून कामे सुरु असलेल्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष सकाळी आणि सायंकाळी हजेरी घेतली जात आहे. दरम्यान, सध्या मजूर मित्र संकल्पनाही राबविली जात असल्याचे रोहयो विभागातून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील अशी आहे आकडेवारी...तालुका सुरु कामे कार्यरत मजूरअहमदपूर ३२२ १९८१औसा ३५५ ३१४०चाकूर १०२ ८००देवणी १०० १६२३जळकोट १०८ ६४८लातूर २२३ १३०१निलंगा १२४ ९४४रेणापूर २०५ १८४९शिरुर अनं. ५५ ३५२उदगीर ३३८ २६५५एकूण १९३२ १५२९३

टॅग्स :laturलातूर