शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील १८० निवासी डॉक्टर संपावर

By हरी मोकाशे | Published: January 02, 2023 6:00 PM

महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स संघटना (मार्ड) च्या वतीने सोमवारपासून राज्यव्यापी बेदमुत संप पुकारण्यात आला आहे.

लातूर : राज्यातील शासकीय महाविद्यालयातील अपुऱ्या व मोडकळीस आलेल्या वसतीगृहामुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १४३२ जागांच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव निकाली काढावा, यासह अन्य मागण्यांसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून संप पुकारला आहे. यात येथील १८० निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स संघटना (मार्ड) च्या वतीने सोमवारपासून राज्यव्यापी बेदमुत संप पुकारण्यात आला आहे. सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची पदे तातडीने भरावीत. त्यामुळे निवासी डाॅक्टरांचे व पदवीपूर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे. महागाई भत्ता तात्काळ अदा करण्यात यावा. राज्यतील वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करुन सर्व वरिष्ठ निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करावे, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे आंदोलन मार्डचे अध्यक्ष डॉ. अनिल चव्हाण, सचिव याश्वीन डिसुजा यांच्या नेतृत्वाखाली झाले. आंदोलनात उपाध्यक्ष डॉ. स्वप्नील कदम, डॉ. सैफ शेख, डॉ. मयूर अग्रवाल, डॉ. अश्विन बावीस्कर यांच्यासह निवासी डॉक्टर सहभागी झाले होते.

अधिष्ठातांच्या दालनासमोर निदर्शने...निवासी डॉक्टरांनी सकाळी ९ ते दुपारी १ वा. पर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. आमच्या मागण्या तात्काळ मान्य करा अन्यथा आंदोलन आणखीन तीव्र करु अशा घोषणा देण्यात आल्या. निवासी डॉक्टरांनी दिवसभर बाह्यरुग्ण विभागात आरोग्य सेवा न दिल्याने रुग्णसेवेर परिणाम झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :laturलातूरdoctorडॉक्टर