या उपक्रमाचे उद्घाटन गावातील नागरिक मदन गिरी यांच्या झाले. यावेळी सरपंच गोरख सावंत, ग्रामसेवक दत्ता गायकवाड, उपसरपंच दयानंद लाटे, ग्रामपंचायत सदस्य हणमंत पवार, सतीश पाटील, मनोज सावंत, राजाराम जाधव, बालाजी सावंत आदी उपस्थित होते.
हेळंब गावातील ग्रामपंचायतीचे वॉटर फिल्टर काही दिवसांपासून बंद होते. त्यामुळे सदरील वॉटर फिल्टर सुरु करावे, आणि ५ रुपयांऐवजी २ रुपयांत २० लिटर शुध्द पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी नागरिकांनी ग्रामसभेत केली होती. नागरिकांची ही मागणी ऐकून सरपंच गोरख सावंत यांनी बंद असलेले फिल्टर मशीन तात्काळ दुरुस्त करून घेऊन २ रुपयांमध्ये २० लिटर शुद्ध पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी तात्काळ वॉटर फिल्टर दुरुस्त करुन घेऊन २ रुपयांमध्ये २० लिटर शुद्ध पाणी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.