शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

ट्रान्सफार्मर जळाल्याने उदगीरातील २५ गावे चार दिवसांपासून अंधारात

By हरी मोकाशे | Published: September 08, 2022 5:56 PM

बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही समस्या

उदगीर (जि. लातूर) : ग्रामीण भागासाठी वीज पुरवठा करण्यासाठीचा १३२ केव्ही उपकेंद्रातील १६ एमव्हीए क्षमतेचा एक ट्रान्सफार्मर जळाल्याने चार दिवसांपासून तालुक्यातील २५ गावांसह शहरातील काही भाग अंधारात आहे. वीजपुरवठा बंद झाल्यामुळे बहुतांश गावांत पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे.

तालुक्यातील गावांच्या वीज पुरवठ्यासाठीच्या १३२ केव्ही उपकेंद्रातील १६ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर चार दिवसांपूर्वी जळाला आहे. परिणामी, शेल्हाळ, तोंडचिर, तादलापूर, बेलसकरगा, धोंडीहिप्परगा, शिरोळ, जानापूर, कौळखेड, मलकापूर, माळेवाडी, बनशेळकी, भोपणी, नेत्रगाव, जकनाळ, मादलापूर, मलकापूरसह अन्य वस्ती, तांडे तसेच शहरातील रेल्वे स्टेशन समोरील भाग, समतानगर, गोपाळनगर, संतोषीमाता नगर, दत्त नगर, बनशेळकी रोड, एसटी कॉलनी, बिदर रस्त्यावरील उड्डाणपूलाच्या उजवीकडील भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.

वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने काही गावांतील जलयोजनाही बंद पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महावितरण व महापारेषणमधील अधिकाऱ्यांत सुसंवाद नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, महावितरणकडे चौकशी केली असता हे काम महापारेषणकडे असल्याचे सांगून हात झटकत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, महापारेषणचे अधिकारी ट्रान्सफार्मर उपलब्ध झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होईल, असे सांगत आहेत.

ट्रान्सफार्मरची जबाबदारी महापारेषणची...महावितरणचे वरिष्ठ अभियंता दराडे म्हणाले, चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात ट्रान्सफॉर्मवर वीज पडल्यामुळे तो जळाला. हा ट्रान्सफॉर्मर बदलण्याची जबाबदारी महापारेषणची आहे. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरु करण्याचा प्रयत्न आहे.

ट्रान्सफार्मर आणण्याची प्रक्रिया सुरु...महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता डी.डी. मरलापल्ले म्हणाले, चार दिवसांपूर्वी ट्रान्सफार्मर जळाला आहे. तो जुना होता. नवीन ट्रान्सफॉर्मर जालन्याहून आणण्याचे काम सुरु आहे. गुरुवारी दुपारपर्यंत ट्रान्सफॉर्मर उदगीरात येणे अपेक्षित होते. परंतु पावसामुळे अहमदपूर- उदगीर रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची वाहतूक करणे शक्य नसल्याने तो जांब, जळकोटमार्गे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. ट्रान्सफॉर्मर बसविल्यानंतर किमान एक दिवस तरी त्याची पूर्णपणे तपासणी करूनच वीजपुरवठा करावा लागतो. त्यानंतरच महावितरणकडे वीजपुरवठा सुरू होईल. या सर्व बाबी तांत्रिक असल्याने किती वेळ लागेल, हे निश्चित सांगता येत नाही.

टॅग्स :laturलातूरmahavitaranमहावितरण