विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शनिवारी ८४३ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ७८७ निगेटिव्ह तर ९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. ८५१ जणांची रॅपिड ॲँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ८३२ निगेटिव्ह तर १९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. प्रयोगशाळेतील चाचणी आणि रॅपिड ॲँटिजेन असे दोन्ही मिळून २८ नव्या बाधितांची भर पडली आहे. सध्या २९६ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १७४ होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ६९० दिवसांवर पोहोचला असून, मृत्यूदर २.९ टक्क्यांवर आहे. तर बरे होण्याचे प्रमाण ९५.८० टक्क्यांवर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एल.एस. देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, शनिवारी २६ रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाली. रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुटी देण्यात आली. यामध्ये वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ५, उदगीर सामान्य रुग्णालय ३, बारा नंबर पाटी वसतिगृह ३, निवासी शाळा औसा येथील १, समाजकल्याण वसतिगृह येथील ३ तर होम आयसोलेशनमधील ७ जणांचा समावेश आहे.