शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

लातूर जिल्हा परिषदेतील ४५० कर्मचाऱ्यांना मिळणार वरिष्ठ वेतनाचा लाभ; दिवाळी झाली गोड!

By हरी मोकाशे | Published: November 22, 2023 6:49 PM

आश्वासित प्रगती योजनेमुळे होणार वेतनात वाढ

लातूर : दहा वर्षांचा कालावधी उलटूनही पदोन्नती न झाल्याने पात्र कर्मचाऱ्यांचे आश्वासित प्रगती योजनेकडे लक्ष लागून होते. दीपावलीच्या कालावधीत जिल्हा परिषदेने आवश्यक ती कार्यवाही जलद गतीने करीत प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे ४५० कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे. परिणामी, या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून दिवाळी आनंदात गोड झाली आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यास त्याच्या सलग सेवेच्या १०, २० आणि ३० वर्षानंतर तीन लाभ अनुज्ञेय आहेत. दरम्यान, पदोन्नती न झालेल्या पात्र कर्मचाऱ्यांचे आश्वासित प्रगती योजनेकडे लक्ष लागून होते. विभागाअंतर्गत बढती न झाली तरी चालेल मात्र वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळावा म्हणून सातत्याने चौकशी करण्यात येत होती. ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमाेल सागर यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी दीपावलीच्या कालावधीत यासंदर्भातील आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागास केल्या. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी विनाविलंब प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे दीपावलीच्या कालावधीत ४५० कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पद वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे.

बांधकाम विभागास सर्वाधिक लाभ...सहाय्यक प्रशासन अधिकारी - १लघुलेखक - १विस्तार अधिकारी सां. - १वरिष्ठ सहाय्यक - ४कनिष्ठ सहाय्यक - १४परिचर - ६३कृषी अधिकारी - १विस्तार अधिकारी कृषी - २सहा. पशुधन वि.अ. - ७प. पर्यवेक्षक - ८शाखा अभियंता - ४७स्थापत्य अभि. सहा. - १प्रमुख आरेखक - २आरेखक - २कनिष्ठ आरेखक - ४मैल कामगार - ११३वाहन चालक - २मिस्त्री - १९औषध निर्माण अधिकारी - ४आरोग्य पर्यवेक्षक - १आरोग्य सेवक पु. - १३आरोग्य सहा. पु. - ७आरोग्य सेवक म. - १६आरोग्य सहा. म. - ४विस्तार अधिकारी पं. - १ग्रामविकास अधिकारी - ६ग्रामसेवक - १७पर्यवेक्षका - ५७कनिष्ठ अभियंता - ३२एकूण - ४५०

योजनेच्या लाभामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन...जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आस्थापनाविषयक अनुज्ञेय असलेले सर्व लाभ वेळीच मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन नेहमीच प्रयत्नशील आहे. आश्वासित प्रगती योजनेचा ४५० कर्मचाऱ्यांना लाभ मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि ते आणखीन हिरीरीने जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कामकाजात सहभागी होऊन लवकरात पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर...जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे लाभाचे सर्व सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. सीईओंच्या मार्गदर्शनाखाली आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेला कर्मचाऱ्यांचा निकाली निघाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनात लवकरच वाढ होणार आहे.- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद