यावेळी शैलेश गोजमगुंडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. राजा नारायणलाल लाहोटी विद्यालयाचा क्षात्रतेज वडणे याने प्रथम, गोदावरीदेवी लाहोटी विद्यालयाची प्रतीक्षा थोरात व श्रीकिशन सोमाणी विद्यालयाची श्रावणी गिरवलकर यांना द्वितीय, तर स्वामी विवेकानंद विद्यालयाची वसुंधरा गंभिरे व मनोज सहदेव अकॅडमीची पायल देसरडा यांना तिसरे पारितोषिक देण्यात आले. यासाेबतच ज्ञानेश्वर विद्यालयाचा नचिकेत कुटवाडे, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची ऋचा शिरसीकर व ज्ञानप्रकाश विद्यालयाची समृद्धी मगर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
यशस्वीतेसाठी संजय अयाचित, शंतनु हिराळकर, वर्षा डोईफोडे, डॉ. शैलेंद्र आपटे, डॉ. चंद्रशेखर अष्टेकर, अमित बच्चेवार, भारत विकास परिषदेचे लातूर शाखेचे अध्यक्ष विश्वास लातूरकर, सचिव सुनील पाटील, कार्यक्रम प्रमुख संतोष पाटील, सुनीता पाटील यांच्यासह सदस्य सुधाकर जोशी, भूषण दाते, शैलेश कुलकर्णी, बालाजी बिरादार, अमित कुलकर्णी, योगेश काळे, सारंग अयाचित, विनोद जोशी, चेतन पंढरीकर, सतीश मनाळे, मुकुंद पाठक, योगिता पत्की, संध्या काळे, श्वेता अयाचित, वृषाली जोशी, शर्मिला कुलकर्णी, विदुला लातूरकर, जयश्री पाटील, स्वाती जोशी, वर्षा कुलकर्णी, आदींनी परिश्रम घेतले.