शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
2
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
3
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
4
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
5
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
6
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
7
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
8
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
9
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
10
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी
12
शेकडो कर्मचाऱ्यांसाठी रतन टाटा बनले संकटमोचक; नोकरीवरुन काढण्याची नोटीस घेतली मागे
13
आफ्रिकन 'सफाई'!! टीम इंडियाच्या पोरींची कमाल, वनडे पाठोपाठ कसोटी मालिकाही जिंकली!
14
७ वर्षात ७० वेळा पेपर फुटला, नीट व्यावसायिक परीक्षा बनवली - राहुल गांधी
15
Success Mantra: आळस तुमच्या प्रगतीच्या आड येत असेल तर 'हे' दहा उपाय करा आणि यशस्वी व्हा!
16
Car Insurance : पावसाळ्यात कार पाण्यात बुडल्यानंतर इन्शुरन्स मिळतो का? जाणून घ्या काय आहे नियम
17
'पीएम मोदींना भेटताना तुम्ही त्यांच्यासमोर झुकलात', राहुल गांधींच्या टीकेवर ओम बिर्लांचा पलटवार
18
राजू शेट्टी यांचे ठरले! विधानसभा निवडणुकीत ३० ते ३५ जागा लढणार, लवकरच ठिकाणे ठरवणार
19
“भाजपा सर्वसामान्य बहुजनांचा पक्ष”; विधान परिषद उमेदवारीवर सदाभाऊ खोतांची पहिली प्रतिक्रिया
20
विराट कोहली आणि रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार? जय शाहांनी केली मोठी घोषणा

५० हजार ॲडव्हान्स, ५ लाखांची डील;‘नीट’ पेपर फुटीचे लातूर कनेक्शन, दुसरा शिक्षक ताब्यात!

By राजकुमार जोंधळे | Published: June 24, 2024 7:19 PM

उमरगा आयटीआयतील आरोपीच्या शोधात पोलिस पथके रवाना

लातूर : नीट प्रकरणात अटक असणारा जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक जलीलखाँ उमरखान पठाण (रा. लातूर) यास सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीतील आरोपीसोबत प्रवेशपत्र घेऊन ५० हजार ॲडव्हान्स आणि संपूर्ण कामाचे ५ लाखांचे डील अशा पद्धतीने व्यवहार केल्याचे संदर्भ तपासात पुढे येत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नीटमध्ये गुणवाढ करून देण्याच्या दृष्टीने दिल्लीतील आरोपी गंगाधर याच्याशी संपर्क असलेला उमरगा आयटीआयतील इरण्णा कृष्णाजी कोनगलवार (मूळ रा. देगलूर, जि. नांदेड) लातुरातील दोघा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र मागून घेत होता. ५० हजारांत बोलणी व्हायची. पूर्ण कामाचे ५ लाख ठरायचे, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडे आली आहे. या प्रकरणात मुख्याध्यापक असलेला आरोपी पठाण कोठडीत असून, दुसरा शिक्षक संजय तुकाराम जाधव (मूळ रा. लातूर, नोकरी सोलापूर) यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. तिसरा आरोपी इरण्णा याच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत.

दुसऱ्या आरोपीची मन:स्थिती जिवाचे बरेवाईट करण्याची...दुसरा आरोपी संजय तुकाराम जाधव याची मन:स्थिती जिवाचे बरेवाईट करण्याची दिसून आली. त्याच स्थितीत पोलिसांनी जाधव यास ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे. अजून तरी दप्तरी अटकेची कारवाई नाही.

पदभार दुसऱ्या शिक्षकाकडे...अटकेत असलेला आरोपी मुख्याध्यापक जलील पठाण यास सोमवारी न्यायालयाने २ जुलैपर्यंत कोठडी सुनावली. दरम्यान, केंद्र प्रमुखाने त्याच्या कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील कपाट सील केले असून, कामाचा पदभार दुसऱ्या शिक्षकाकडे दिला आहे. २० जूनपासून पठाण शाळेवर गैरहजर असताना २० व २१ जून रोजी मस्टरवर स्वाक्षरी केली आहे. तसा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना पाठविला आहे. दरम्यान, अटकेसंदर्भातील कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर निलंबनाचा प्रस्ताव पाठविणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

इरण्णाची भूमिका काय?उमरगा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नोकरीवर असलेला इरण्णा कोनगलवार लातूर येथून ये-जा करतो. सोमवार व मंगळवारची त्याने रजा टाकल्याची माहिती आहे. लातुरातील संशयित आरोपी शिक्षक हे विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे इरण्णाला पाठवीत होती. इरण्णा ती पुढे दिल्लीला गंगाधरकडे पाठवीत. या प्रकरणात तो मध्यस्थाची भूमिका वठवीत होता व त्याच्याच माध्यमातून दिल्लीशी कनेक्शन सुरू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालlaturलातूर