शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

५११ ग्रामसेवकांना जि.प.कडून नोटिसा

By admin | Published: July 05, 2014 11:52 PM

लातूर : जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरु केल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची विविध प्रमाणपत्रांसाठी गैरसोय होत आहे़

लातूर : जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरु केल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची विविध प्रमाणपत्रांसाठी गैरसोय होत आहे़ ही गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक कंत्राटी ग्रामसेवकावर १० ते १२ गावांच्या कारभाराचा भार टाकण्यात आला असला तरी तो अपुरा पडत आहे़ दरम्यान, जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामसेवकांना सात दिवसांत कामावर हजर राहण्याच्या सूचना देत नोटिसा बजावल्या आहेत़जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये ७८७ ग्रामपंचायती आहेत़ या ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी शंभर ग्रामविकास अधिकारी, ४११ ग्रामसेवक आहेत़ या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आणि ग्रामसेवकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे़ त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिकांवर होत असल्याचे दिसून येत आहे़ दहावी, बारावी आणि इतर वर्गांच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे़ त्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता सध्या विद्यार्थ्यांची धावपळ सुरु आहे़ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ग्रामपंचायतीच्या विविध कागदपत्रांची आवश्यकता असते़ त्याचबरोबर पावसाने ताण दिल्याने टंचाईने तीव्र रुप धारण केले आहे़ त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ तसेच निवडणुकीची आचारसंहिता नुकतीच संपुष्टात आली आहे़ आचारसंहितेमुळे अनेक प्रशासकीय कामे खोळंबली आहेत़ अशा परिस्थितीत ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन पुकारले असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी अडचण होत आहे़ विशेष म्हणजे, ग्रामपंचायतींच्या तुलनेत ग्रामसेवकांची संख्या कमी असल्याने प्रत्येक ग्रामसेवकाकडे किमान दोन ग्रामपंचायतींचा कारभार आहे़ त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांना ग्रामसेवकाच्या कागदपत्रासाठी प्रतीक्षा करावी लागत असे़ आता ग्रामसेवकांच्या काम बंद आंदोलनामुळे तर मोठी गैरसोय होत आहे़ परिणामी, ग्रामीण भागातील काही ग्रामपंचायतींचे दोन दिवसांपासून कुलूपही उघडेनासे झाले आहे़ विविध कामानिमित्ताने नागरिकांचे हेलपाटे सुरु आहेत़ दरम्यान, प्रशासनाने त्याची दखल घेत काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामसेवकांना नोटीसा बजावण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले़ त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील ग्रामसेवकांना शुक्रवारी नोटिसा बजावल्या आहेत़(वार्ताहर)नागरिकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून जिल्ह्यातील २३ विस्तार अधिकारी आणि ९७ कंत्राटी ग्रामसेवकांवर अतिरिक्त भार टाकण्यात आला आहे़ प्रत्येक कंत्राटी ग्रामसेवकास किमान १०- १२ गावांचे काम पहावे लागत आहे़ तसेच पंचायत समितीच्या फलकावर तात्पुरत्या ग्रामसेवकांची यादी डकविण्यात आली आहे़ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांची वेतन त्रुटी दूर करावी, ग्रामपंचायतस्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरु करावी़, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून ग्राह्य धरावा़, २० ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करावे़, प्रवासभत्ता वेतनासोबत ३ हजार रुपये करावा़ आंदोलनात सहभागी झालेले ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत़ ७ दिवसांत कामावर हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ संजय तुबाकले यांनी सांगितले़