शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

बँकेत ५९ लाखांचा दरोडा: दरोड्यासाठी गॅस कटरचा वापर, सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील पळवला

By राजकुमार जोंधळे | Published: September 06, 2022 5:08 PM

दराेडेखाेरांनी अनेक दिवसांपासून या दराेड्याचे प्लॅनिंग केल्याचा अंदाज

शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) : येथील राज्यमार्गावर शहराच्या मध्यभागी नगरपंचायत कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेवर सोमवारी मध्यरात्री टाकण्यात आलेल्या दरोड्यात गॅसकटर आणि ऑक्सिजन सिलेंडरचा वापर केल्याची माहिती समाेर आली आहे. पाेलिसांनी तो सिलेंडर जप्त केला आहे. अतिशय शिताफीने दराेडेखाेरांनी दराेडा टाकत तब्बल २७ लाखांची राेकड आणि ३१ लाखांचे साेने असा जवळपास ५९ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. याबाबत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात अज्ञताविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, शिरूर अनंतपाळ शहरातून गेलेल्या राज्यमार्गालगत नगरपंचायतची दुमजली इमारत आहे. तळमजल्यात नगरपंचायत कार्यालय असून, दुसऱ्या मजल्यावर महाराष्ट्र ग्रामीण बॅकेची शाखा कार्यरत आहे. सध्याला नगरपंचायत कार्यालयाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असून, तळमजल्यातील काही भिंतींचे ताेडकाम करुन नुतनीकरण केले जात आहे. परिणामी, चोरट्यांनी बॅंकेत प्रवेश करून चॅनल गेटचे कुलूप तोडले. त्याचबराेबर बॅंकेच्या दाराला लावलेले कुलूपही दराेडेखाेरांनी ताेडले. यासाठी आवश्यक गॅस कटर, सिलेंडर साेमबत आणत हा धाडसी दराेडा दराेडेखाेरांनी टाकला. बॅकेतील तिजोरी त्याचबराेबर त्याचे लाॅकर कटरच्या मदतीने कट करून तब्बल २७ लाख १२ हजार ८३० रुपयांची राेकड, तसेच साेने तारण ठेवून कर्ज घेतलेल्या एकंदर १४ कर्जदाराचे ३१ लाख ७९ हजार १७६ रूपयांचे सोने असा एकूण ५८ लाख ९४ हजार ६ रूपयाचा मुद्देमाल पळविला आहे. 

सीसीटीव्हीचा डीव्हीआरही पळविला...दराेडेखाेरांनी अतिशय शिताफिने हा दरोडा टाकल्याचे समाेर आले आहे. बॅकेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद हाेणार नाही, यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याना बॅकअप रेकाॅर्ड करुन ठेवणारा डीव्हीआरच दराेडेखाेरांनी पळविला आहे. यातून दराेडेखाेरांनी अनेक दिवसांपासून या दराेड्याचे प्लॅनिंग केला असावा, असा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे.

तीन तपास पथके तैनात...शिरूर अनंतपाळ शहरासह तालुक्यात आजपर्यंतचा सर्वात मोठा दरोडा असल्याने पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिकारी अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दराेडेखाेरांच्या अटकेसाठी तातडीने तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांच्यासह तीन पथके तैनात करण्यात आली आहे.

 

टॅग्स :laturलातूरbankबँकRobberyचोरी