शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

लातूरात ७२ लाखांच्या दारूचा ट्रक पळवणाऱ्या दराेडेखाेरांचा इतर जिल्ह्यांतही वावर !

By राजकुमार जोंधळे | Published: May 20, 2024 7:24 PM

लातूर स्थागुशाखेच्या कारवाईत गुन्ह्यातील जीप, दुचाकी जप्त...

लातूर : धर्माबाद (जि. नांदेड) येथील कारखान्यातून काेल्हापूरकडे ७२ लाखांची दारूची वाहतूक करणारा ट्रकच दराेडेखाेरांनी पळवला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाैघांना धाराशिव जिल्ह्यासह इतर ठिकाणांहून अटक केली. गुन्ह्यातील पांढऱ्या रंगाची जीप, बुलेट पाेलिसांनी जप्त केली आहे. हा गुन्हा किमान आठ ते दहा जणांनी केला असावा, असा संशय पाेलिसांनी व्यक्त केला आहे. या टाेळीचा इतर जिल्ह्यांतही वावर असल्याचे समाेर आले आहे.

पाेलिसांनी सांगितले, धर्माबाद येथून कोल्हापूरकडे निघालेला विदेशी दारूचा ट्रक चाकूर ते आष्टामोड दरम्यान पांढऱ्या रंगाची जीप आडवी लावून थांबवला. यावेळी चार ते पाच जणांनी ट्रकमध्ये घुसखोरी केली. चालकासह इतरांना चाकूचा धाक दाखवत स्टेअरिंगवर ताबा मिळवला. दरोडेखोरांनी त्यांच्या चेहऱ्यावर चादर टाकली आणि हा ट्रक पुढे बार्शी महामार्गावरील बोरगाव काळे परिसरात आणला. ट्रकमधील चालकासह इतरांना खाली उतरण्यास सांगत हातपाय बांधले आणि दारूसह ट्रक पळवला. दराेडेखाेरांच्या मागावर स्थागुशा हाेती. खबऱ्याच्या माहितीनुसार, धाराशिव आणि इतर ठिकाणांहून चाैघांना अटक केली. झाडाझडती घेत हिसका दाखवल्यानंतर दारू बाॅक्सचा सुगावा लागला. पाेलिसांनी ९०० दारूचे बाॅक्स, ट्रक असा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्ह्यात वापरलेली बुलेट बार्शीतून चाेरल्याचे उघड...दारूचा ट्रक पळविल्याच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली बुलेट ही बार्शी (जि. साेलापूर) येथून आराेपींनी चाेरल्याचे समाेर आले आहे. पाेलिसांनी बुलेट मालकाचा शाेध घेतला आहे. आता जीपही हाती लागली आहे. आणखी कुठे गुन्हे केले आहेत का? याचा शाेध घेतला जात आहे.- संजीवन मिरकले, पाेनि., स्थागुशा, लातूर

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला छडा...ही कारवाई स्थागुशाचे पो. नि. संजीवन मिरकले, सपोनि. विश्वंभर पल्लेवाड, सपोनि. प्रवीण राठोड, पोउपनि. संजय भोसले, रियाज सौदागर, राजेश कंचे, योगेश गायकवाड, प्रदीप स्वामी, राहुल कांबळे, रामहरी भोसले, मनोज खोसे, खुर्रम काझी, राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, दीनानाथ देवकते, रवी गोंदकर, तुराब पठाण, नितीन कटारे, मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, चालक नकुल पाटील, सचिन मुंडे, प्रदीप चोपणे, चंद्रकांत केंद्रे, व्यंकट निटुरे यांच्या पथकाने केली. यात सायबर सेलचे सपोनि. नलिनी गावडे, संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुडे यांनीही सहकार्य केले.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी