रवी माणिकराव बिरादार (४५), कैलास जगन्नाथ बिरादार (२४), संदीप श्रीमंतराव पाटील (२९, सर्व रा. रायफळी, ता. बसवकल्याण, कर्नाटक), प्रवीण निजलिंगे (२५ रा. उत्ता, ता. भालकी, कर्नाटक), सलीम हाबीब दायमी (४५, रा. उदगीर), नेहा सलीम दायमी (१५, रा. उदगीर), जौस रफिक शेख (चालक, वाढवणा बु. ता. उदगीर) अशी मृतांची नावे असून, आठव्या मृताची ओळख पटली नाही. लक्ष्मीबाई माधव जाधव (रा. एकुर्का रोड), दशरथ नागोराव वाघमारे (५०, रा. उदगीर), राजकुमार माणिकराव बिरादार (२२, रा. रायफळी, ता. बसवकल्याण) आणि राजकुमार श्रीमंत हलशेट्टे (२५, रा. मुचळंब, ता. भालकी) हे चौघे गंभीर जखमी आहेत. अहमदपूरहून उदगीरकडे २१ प्रवासी घेऊन भरधाव वेगाने निघालेली ही क्रुझर जीप (एम. एच. २० ए. जी. ६७१७) व उदगीरहून अहमदपूरकडे निघालेल्या कंटेनर (एम. एच. ०४ ई. ९६०६) यांच्यात कल्लूरनजीक रविवारी रात्री समोरासमोर हा भीषण अपघात झाला. यात जीपचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. जीपमधील सात प्रवासी जागीच ठार झाले. जखमी प्रवाशांना उदगीर येथील ग्रामीण रुगणालयात दाखल करण्यात आले असून, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. चार प्रवासी गंभीर जखमी आहेत. अपघात होताच कल्लूर, इस्मालपूर आणि वाढवणा येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने बाहेर काढले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती़. अहमदपूरहून उदगीरकडे निघालेल्या क्रुझर जीपमध्ये २१ प्रवासी खचाखच कोंबले होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातात माधव दगडू जाधव (दोघे रा़ एकुर्का रोड), नामदेव दत्तात्रय शिंगडे (३२, इस्मालपूर), नरसिंग धोंडिबा सोनवणे (३५, शेल्हाळ), सना सलीम दायमी (१४), शमशाद बेगम दायमी (३६ रा़ उदगीर), राकेश नेताजी मादळे (१८ रा़ उदगीर), बालाजी झटु कांबळे (३५ रा़ शेल्हाळ), गणेश काशिनाथ लोहार (२०, कुंदेसिरसी, ता़ भालकी, जि़ बीदर), लक्ष्मण व्यंकटप्पा बिरादार (२९, रायफळी ता़ बसवकल्याण) हे नऊ जण जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
जीप-कंटेनरच्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू
By admin | Published: July 17, 2016 9:24 PM
अहमदपूरहून उदगीरकडे चाललेल्या जीपला समोरून आलेला कंटेनेरने जोरदार धडक दिली. यात सात जण जागीच ठार तर एकाचा उदगीरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. १७ - अहमदपूर-उदगीर राज्य मार्गावरील कल्लूरनजीक (ता. उदगीर) झालेल्या जीप-कंटेनरच्या भीषण अपघातात आठ प्रवासी ठार, तर १३ जखमी झाले. यातील चौघे गंभीर आहेत. हा अपघात रविवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास झाला. सर्व जखमींना उदगीरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.