येथील लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात हे शिबिर घेण्यात आले. शिबिरास माजी आमदार गोंविद केंद्रे, भगवानराव पाटील तळेगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, रामचंद्र तिरुके, धर्मपाल नादरगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, नगराध्यक्ष बस्वराज बागंबदे, बस्वराज रोडगे, सुधीर भोसले, बापूराव राठोड, पंडित सूर्यवंशी, साईनाथ चिमेगावे, रमाकांत चटनाळे, प्रशांत देवशेट्टे, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील आदींनी भेट दिली. शिबिरात डॉक्टर डे निमित्ताने डॉ. अनुप चिकमुर्गे, डॉ. श्रीकांत मुंढे, डॉ. विजय बिरादार यांनी रक्तदान केले. यशस्वीतेसाठी नागप्पा अंबरखाने रक्तपेढीचे डॉ. बी.एस. शेटकार, माधव बिरादार, सचदेव सिरसाट, अविनाश बिरादार, सुलोचना साबळे, स्वामी, दिलीप मजगे, अमोल निडवदे, रमेश शेरीकर, नागेश आष्टुरे, विरेश स्वामी, नंदू बिजलगावकर, शिवानंद होनमोडे, उदयसिंह ठाकूर, गणेश गायकवाड, नामदेव आपटे, अमित बोळेगावे, प्रितम वीरशेट्टे, वीरलाल कांबळे, अजय पाटील, मंगेश येरकुंडे, यशवंत बारस्कर, धनराज नादरगे, विशाल सूर्यवंशी, शिवा फत्तेपुरे, बस्वराज बेलुरे, अमोल बिरादार यांच्यासह नागनाथअण्णा निडवदे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
उदगीरातील शिबिरात ८१ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:14 AM