लस देण्यासाठी ३० टीम तयार करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये सरकारी आणि खाजगी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. चार प्रकारची लस असून, त्यात व्हेरियस व्हॅक्सीन, व्हायरल व्हेक्टर व्हॅक्सीन, नेवेलिक ॲसिड व्हॅक्सीन आणि प्रोटीन बेस्ड् व्हॅक्सीनचा समावेश आहे. मात्र अद्याप या व्हॅक्सीन जिल्ह्याला प्राप्त झालेल्या नाहीत. विभागीय पातळीवर पाहिजे त्या तापमानात लस ठेवण्याचे केंद्र आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लातूरमध्ये आहे. फक्त प्रतीक्षा लस येण्याची आहे.
शीतगृहांची जय्यत तयारी
आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात विभागीय शीतगृह आणि जिल्हास्तरावर तसेच आरोग्य केंद्रस्तरावर १२ ठिकाणी शीतगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. एक महिन्यापर्यंत लस ठेवायची झाल्यास मायनस तापमानात ती ठेवता येईल, अशी सोय केली आहे. चार प्रकारच्या लस येतील, असे ग्राह्य धरून शीतगृहांची अत्याधुनिक पद्धतीने उभारणी करण्यात आली आहे.
लस पोहोचविण्यासाठी व्हॅक्सीन व्हॅन
विभागीय शीतगृहापासून तालुका आणि आरोग्य केंद्रस्तरावर लस पोहोचविण्यासाठी व्हॅक्सीन व्हॅन तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये डीफ फ्रीजरची सोय आहे. एकच व्हॅक्सीन व्हॅन असेल. कोल्ड चेन पाॅईंट ५९ तयार केले आहेत, त्या ठिकाणी ही लस पोहचती होईल, असे जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. गंगाधर परगे यांनी सांगितले.
आरोग्य केंद्रनिहाय साठवणूक क्षमता
बाभळगाव ९७८३
रेणापूर ९७८३
कासारशिरसी ९७८३
निलंगा ८२७०
औसा ८२४६
अहमदपूर १९३७४
उदगीर १४६७८
चाकूर ९७८३
किल्लारी ९७८३
जळकोट १४५६५
मुरुड २१३०४
देवणी १९५०५