शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; न्याहारीला सुशीला, जेवणात भोकरी-वरण, रातच्याला मिळणार समद्यांनाच ‘धपाटे’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 1:22 PM

उदगीरात येत्या २२ तारखेपासून होत असलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तीन दिवसांचे मेन्यू कार्ड भोजन समितीचे शिवशंकर हल्लाळे यांनी दाखवून एक-एक पदार्थ वेगळा कसा हे सांगितलं.

व्ही. एस. कुलकर्णी -उदगीर (जि. लातूर) : उदगीरकर खाण्यात अन् खाऊ घालण्यात लई भारी... सुशीला खाल्ल्याशिवाय उदगीरकरांची न्याहारीच नाही. इथल्या भोकरी-वरणाला तर तोडच नाही. धपाटे अन् दही खाल तर काय भारी हो, असंच म्हणाल. उदगीरची हीच खास मेजवानी आता साहित्यिकांच्या जिभेवर तीन दिवस अधिराज्य गाजवणार आहे. हा मेन्यू खाल्ल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘लई भारी हो... मायच्यान ही आठवण इसरणार नाही आम्ही.’उदगीरात येत्या २२ तारखेपासून होत असलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तीन दिवसांचे मेन्यू कार्ड भोजन समितीचे शिवशंकर हल्लाळे यांनी दाखवून एक-एक पदार्थ वेगळा कसा हे सांगितलं. तुम्ही सर्वत्र सगळं खातावच हो, पण इथली चव चाखल्यावर खवय्ये उदगीरकर काय चीज आहेत, हे पावण्यांना दिसंल. इथली पुरणपोळी तुम्ही खाऊनच बगा. राजाराणी मिठाई अन् केशरी जिलेबी गोडवा वाढवायला हाय.पयल्या दिवशी स्पेशल पांढरा उपमा, पोहे अन् केळीचा असंल. दुपारच्याला फुलके, मसाला पुरी, वरण-भात, दोडका-मूगडाळीची भाजी, स्पेशल मिक्स भाजी, वरण-भात वरून राजाराणी मिठाई. राती ज्वारीच्या भाकरीसंगं भोकरी डाळ असंल. मेथीचा झुणका, मटकीची उसळ तर दुसऱ्या दिवशीच्या न्याहारीला साऊथ इंडियन इडली, वडा-सांबर अन् ज्यांना लागंल त्यांना शाबुदाणा खिचडी.. जेवणात पुरी, बेसनाची वडी, वरणभात, बटाट्याची भाजी आणि केशर जिलबी. रातच्या जेवणात उदगीर स्पेशल धपाट्याला कढीची सोबत राहील. संगट (सोबतीला) शेवभाजी, चवळीची भाजी, रातीच्या जेवणात दालफ्राय, मुगाची भीज, भेंडीची भाजी, जिरा राईस, गव्हाची खीर राहील. तिसऱ्या दिवशीच्या मेन्यूत थालीपीठाच्या मेजवानीसह इतरही नवी टेस्ट सगळ्याना मिळंल.’ 

एकदा खाल तर पुना उदगीरला याल... nशेतातील राशी आटोपल्या की केली जाणारी भोकरी डाळ. अनेक मसाल्यांचे मिश्रण असलेली ही डाळ अनेक जण भाकरीसोबत कुस्करून वरपून खातात. कांदा, लिंबू असतोच संगट. मुरमुरे पाण्यात भिजवून लगीच काढल्यानंतर पोह्यासारखीच रेसिपी करून फोडणी देणे हा स्पेशल प्रकार. - उदगिरातील हॉटेलमध्ये सुशीला मिळतोच. इथले धपाटेही एकदम  हटके. आठवडाभर, महिनाभर टिकणारे धपाटेही उदगीरमध्ये मिळतात. तशीच इथली कडक भाकरीही महिनाभर टिकते. दह्यासोबत धपाटे खाल तर उदगीरचे धपाटे... काय होते हो, ही आठवण तुम्ही कायम स्मरणात ठेवाल. 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनliteratureसाहित्य