शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Latur Bus Accident: लातूरजवळ भीषण अपघात! दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बस उलटली, ४१ प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 17:56 IST

Latur ST Bus Accident: अपघात बसमधील ४१ प्रवासी जखमी झाले असून त्यातील ७ प्रवासी गंभीर आहेत.

Latur Bus Accident: लातूर ते चाकूर महामार्गावर नांदगाव पाटीजवळ दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस उलटल्याची घटना सोमवारी दुपारी १.४३ वाजण्याच्या सुमारास घडली. यात ४१ प्रवासी जखमी झाले आहेत. तर सात जण गंभीर असून, दोघांचे हात शरीरापासून वेगळे झाले आहेत. जखमींना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना रूग्णालयात पोहचविण्यासाठी मदत केली. अहमदपूर आगाराची बस लातूरकडे येत असताना चाकूर तालुक्यातील नांदगाव पाटीनजीक दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात उलटली. घटनेनंतर जखमींना तत्काळ रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, सर्वोपचार रूग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

जखमींची नावे अशी: जखमींमध्ये प्रीती कानवटे (वय २२, रा. तळेगाव), अनुसया रोमपटवार (६०, रा. शिरूर), मुरलीधर बंदखडके (७०), रवी देशमुख, व्यंकट भोगे (६१, रा. हडोळती), पार्वती घुगे (४४, रा. अहमदपूर), महानंदा कांबळे (३२, रा. चाकूर), महादेव आडे (२३, रा. लातूर), गोविंद रोमपटवार (६०, रा. शिरूर), नसिम कुरेशी (५०, रा. लातूर), वर्षा घुगे (३३, रा. उदगीर), राम जमादार (३१, रा. चाकूर), गंगाधर सोपान बादाडे (४५, रा. अहमदपूर), वामन जाधव (६५, रा. चाकूर), प्रशांत कांबळे (४१, रा. चाकूर), बालाजी मोतीराम भुरे (५५, रा. अहमदपूर), अंजनाबाई माने (५०, रा. अहमदपूर), सुरेखा सूर्यवंशी (५०, रा. ममदापूर), अरुणा तोगरे (६३, रा. चाकूर), शाहुराज घोलप (४५, रा. राबुधोडा), शोभा मदने (३०, रा. गांजूर), अजित सुरवसे (२१, रा. ममदापूर), कपिल चिवडे (२१), सुनीता (३५, रा. चाकूर), मुरलीधर देवकते, इंदुबाई माडगे (५०), प्रथमेश माडगे, बशीर कुरेशी (५५), कमलाबाई (७०), सिद्धनाथ मदने (३५), शकुंतला सदानंदे (५५, रा. उदगीर), गजानन सोनकांबळे (१६, रा. टाकळगाव), सुकुमार गरेकर (२१, रा. टाकळगाव), गोरोबा मरडे (५४), अनुसया मरडे (३६, रा. चाकूर), सिद्धनाथ मरडे (१६, रा. चाकूर), कचरू गायकवाड (७५), लक्ष्मण येमले (५३, रा. लातूर), सिद्धेश्वर मदने (३५, रा. गांजूर), अब्दुल पठाण (रा. लातूर), शेख अझिमोद्दीन (रा. लातूर) यांचा समावेश आहे.

टॅग्स :AccidentअपघातlaturलातूरViral Videoव्हायरल व्हिडिओ