शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस
2
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
3
रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ
4
"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती
5
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड
6
"मी अशा राज्यातून येते, जिथे हिंदी शिकणं गुन्हा वाटतो"; निर्मला सीतारामन लोकसभेत भडकल्या
7
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे
8
महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण?
9
IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी
10
खेडेगावातील लेकीने रचला इतिहास; एकाच वेळी ३ सरकारी नोकऱ्या, आता IAS होण्याचं स्वप्न
11
मोबाइल सायबर हल्ल्यांमध्ये भारत आघाडीवर; २०० हून अधिक अ‍ॅप्स धोकादायक!
12
Pushpa 2 Review: अल्लू अर्जुन नव्हे तर 'या' कलाकाराने गाजवला 'पुष्पा 2'! सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर
13
राहुल गांधींच्या संभल दौऱ्यावरून काँग्रेस-सपामध्ये मतभेद, रामगोपाल यादव म्हणाले...
14
मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावण्यासाठी अभिनेत्याला मिळाले पैसे, म्हणाला- "पांढरे कपडे घालून यायला सांगितलं आणि..."
15
"कृषीमंत्र्यांनी जे लेखी वचन दिलं होतं, त्याचं काय?"; उपराष्ट्रपती धनकड यांनी सरकारचे पिळले कान
16
IND vs AUS : 'त्या' प्रश्नावर KL राहुल म्हणाला; मला सांगितलंय की, कुणाला काही सांगू नकोस!
17
मुंबई-बेंगळुरूपेक्षा 'या' शहरात घरे झाली महाग; गेल्या ३ महिन्यात किमतीत ३२ टक्क्यांची वाढ
18
मॉर्निंग वॉकसाठी नेमकी कोणती वेळ आहे सर्वोत्तम?; 'या' गोष्टींचा विचार केल्यास जास्त फायदा
19
राजकीय हालचालींना वेग! महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा करणार दावा
20
राहुल आणि प्रियंका गांधी संभलकडे रवाना, रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त

ग्रामपंचायतीचा धाडसी ठराव; अवैध दारुविक्री करतोय? मग विसर शासकीय योजनांचा लाभ

By हरी मोकाशे | Published: July 27, 2023 6:38 PM

अवैध दारुविक्रेते तसेच त्यांना मदत करणाऱ्यांना दणका

बेलकुंड : गावातील अवैध दारूविक्री बंद व्हावी म्हणून सातत्याने प्रयत्न करुनही यश मिळत नसल्याने अखेर औसा तालुक्यातील तावशी (ताड) येथील गावकऱ्यांनी धाडसी निर्णय घेतला आहे. अवैध दारुविक्रेत्यास तसेच त्यांना मदत करणाऱ्यास यापुढे कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ न देण्याचा ठराव ग्रामपंचायतीने पोलिस अधिकाऱ्यांच्या समक्ष बुधवारी घेतला.

तीन हजार लोकसंख्या असलेल्या औसा तालुक्यातील तावशी (ताड) येथे काही वर्षांपासून अवैध दारुविक्री वाढली आहे. त्यामुळे गावात तंट्यांचे प्रमाणही वाढले आहे. शिवाय, तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे घरोघरी भांडणे वाढत असून, काही जणांचे संसारही उद्ध्वस्त झाले आहेत. गावातील अवैध दारुविक्री बंद करण्यात यावी म्हणून सातत्याने पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, दारुबंदी तात्पुरती बंद होत असे.

काही दिवस उलटले की पुन्हा अवैध दारुविक्री सुरु होत असते. त्यामुळे गावकऱ्यांनी बुधवारी पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अवैध दारुविक्री बंद करावी, अशी मागणी केली. अवैध दारुविक्री करणाऱ्यांवर तसेच त्यांना मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. ही कारवाई झाल्यानंतर त्यांना जामीन करण्यात येऊ नये. तसेच कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ देण्यात येऊ नये. शिवाय, रेशन दुकानातून धान्यही देऊ नये, असा ठराव ग्रामपंचायतीने घेतला. तेव्हा पोलिस अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी सरपंच रमा गौतम कांबळे, उपसरपंच अर्जुन घाडगे- पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष मोहन जगताप यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

अवैध दारुविक्रीला चाप...गावात गेल्या काही वर्षांपासून अवैध दारूविक्री होत आहे. ती बंद व्हावी म्हणून सातत्याने प्रयत्न करण्यात आले. परंतु, अवैध दारूविक्रेत्यास काहीजण मदत करीत असल्याने अडचण होत होती. अखेर ग्रामपंचायतीने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे निश्चितच गावातील अवैध दारुविक्री बंद होईल. तसेच गावातील तंट्यांचे प्रमाण कमी होईल.- अर्जुन घाडगे- पाटील, उपसरपंच, तावशी (ताड).

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतalcohol prohibition actदारुबंदी कायदाlaturलातूर