शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
3
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
4
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
5
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
6
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
7
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
8
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
9
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
10
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
11
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
12
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
13
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
14
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
15
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
16
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
17
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
18
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
19
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
20
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही

कर्तव्यावर असलेल्या मोटार वाहन निरीक्षकास मारहाण; लातूरच्या RTO कार्यालयातील घटना

By आशपाक पठाण | Published: September 13, 2022 5:19 PM

लातूरमधील आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकास मारहाण करण्यात आली. 

लातूर: येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असलेल्या एका मोटार वाहन निरीक्षकास कर्तव्यावर असताना मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.२० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आरटीओ कार्यालयातील वाहन फिटनेस तपासणीच्या ट्रॅकवर कार्यरत असलेल्या एका मोटार वाहन निरीक्षकासोबत काही महिला व सोबतच्या व्यक्तींनी बाचाबाची सुरू केली. यावेळी काहीजण भांडण सोडविण्यासाठी गेले. वादावादी सुरु असताना काही जणांनी मोटार वाहन निरीक्षकास धक्काबुक्की केली. ट्रॅकवरचा गोंधळ पाहून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये हे घटनास्थळी आले. त्यांनी संबधित कुटूंबाची समजूत काढली. दरम्यान, विवेकानंद चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी आरटीओ कार्यालयाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

कौटूंबिक वादातून घडला प्रकार मोटार वाहन निरीक्षकास मारहाण करणारे त्यांच्या कुटूंबातील सदस्य आहेत. कौटूंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले. कर्तव्यावर असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करुन मारहाण केल्याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

टॅग्स :laturलातूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी