लातूर : दाेन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांविराेधात शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, अमाेल देवीदास जाधव (वय ३४ रा. अंबाजाेगाई राेड, लातूर) हे सनदी लेखापाल म्हणून काम करतात. त्याच्यासह आईच्या नावे असलेला बाेरवटी येथील १३ आर आणि सिरसी येथील एक एकरचा फेर हा गाेपाळ गाेविंद लकडे (रा. बाेरवटी) याने भूमिहीन आहाेत म्हणून, गेल्या सहा महिन्यांपासून अडवला आहे. त्याबाबत ८ मार्च राेजी दुपारी लातूर तहसील कार्यालयात सुनावली हाेती. सुनावणीदरम्यान बाहेर आलाे असता, त्यावेळी गाेपाळ लकडे याने ‘तू मला दाेन लाख रुपये खंडणी दिलास तरच फेर लावू देताे, जमिनीचे सुख लागू देताे’ असे म्हणून तुला खल्लास करताे. आठ दिवसांत दाेन लाख रुपये मिळाले पाहिजेत, नाहीतर तुला दाखवताे, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. तहसील कार्यालयातून बाहेर पडताना गाेपाळ लकडे, दत्तात्रय लकडे, अमाेल लकडे यांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली, असे पाेलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत शिवाजीनगर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गाेपाळ लकडे, दत्तात्रय लकडे आणि अमाेल लकडे यांच्याविरुद्ध कलम ३८४, ३८५, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी दिली. तपास पाेलिस काॅन्स्टेबल अंगद सिरसाठ करत आहेत.