शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

भरधाव कारची दुचाकीला धडक, एक ठार तर दोघे जखमी

By आशपाक पठाण | Published: January 11, 2024 11:55 PM

औसा तालुक्यातील चालबुरगा पाटीनजीकची घटना

औसा : वेळाअमावस्या निमित्त शेताकडे आलेल्या पानचिंचोली येथील तरुणाने गावाकडे जाण्यासाठी दुचाकीस्वाराला लिफ्ट मागितली. दुचाकी औशाकडे जात असताना पाठीमागून ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव कारने मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे लांबवर जाऊन पडले. यात पानचिंचोली येथील तरुण जागीच ठार झाला. तर अन्य दोघे जखमी झाले. यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना गुरूवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी सांगितले, दुचाकी क्रमांक एम एच २४ बीयू १४१९ ही लामजन्याहुन औशाकडे येत होती.या दुचाकीवर दोघे जात असताना चलबुर्गा पाटीजवळील  पेट्रोल पंपाच्या शेजारी पाठीमागून येणाऱ्या एम एच १४ एफ एस ६९९९ कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरील दुचाकीला जबर धडक दिली.या अपघातात मोटारसायकल ४० फुटावर फरफटत गेली.अन् कार पेट्रोल पंपाच्या खांबावर आदळली. 

यात दुचाकीस्वार शिवकुमार अशोक कांबळे (वय २२)  यांचा जागीच मृत्यू झाला.तर इतर दोघेही जखमी झाले. जखमींना उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले. मयताचे पार्थिव लामजना येथील आरोग्य केंद्रात ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती. 

टॅग्स :Accidentअपघात