शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
2
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
3
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
4
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
5
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
6
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
7
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
8
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
9
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
10
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
11
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
12
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
13
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
14
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
15
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
16
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
17
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
18
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
19
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

गंठण पळविणाऱ्या एकाला पकडले; ४ दुचाकी, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By राजकुमार जोंधळे | Published: December 01, 2023 8:02 PM

लातुरात राजीव गांधी चौक परिसरात एक महिला सकाळी भाजीपाला खरेदी करून घरी जात हाेती. दरम्यान, दुचाकीवरील दाेघांनी महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावत पळ काढला.

लातूर : महिलांच्या गळ्यातील गंठण पळविणाऱ्या टोळीतील दाेघांना गंठण, चार दुचाकीसह शुक्रवारी पकडले असून, त्याच्याकडून ५ लाख २९ हजारांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई लातुरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने केली आहे.

लातुरात राजीव गांधी चौक परिसरात एक महिला सकाळी भाजीपाला खरेदी करून घरी जात हाेती. दरम्यान, दुचाकीवरील दाेघांनी महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावत पळ काढला. याबाबत शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या उलगड्यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, लातूर डिवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप सागर यांच्या पथकाने आराेपींचा शाेध सुरू केला. पथकाने गुन्ह्याची माेडस आणि इतर बाबींचे विश्लेषण केले. शिवाय, खबऱ्याकडून माहिती मिळवली. दरम्यान, पाेलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा पुणे, हडपसर, टेंभुर्णी, निलंगा आणि लातुरातील विविध भागात शोध घेतला.

राहत्या ठिकाणाहून तिघांना उचलले...सुशील सुनील नाथभजन (वय १९, रा. लातूर), आकाश ऊर्फ महेश रमेश टेळे (वय २५, रा. लातूर) याच्यासह एक अल्पवयीन आराेपीला त्याच्या राहत्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेत अधिक विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली देत महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून पळाल्याचे सांगितले. त्याचबराेबर एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीतूनही एका महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकाल्याची कबुली दिली. तर लातूर शहरातील विविध भागातून काही दुचाकी चोरल्याचेही कबूल केले. त्यांच्याकडून चोरलेले दोन गंठण, चार दुचाकी असा एकूण ५ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई...ही कारवाई पोलिस निरीक्षक दिलीप सागर, पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलिस निरीक्षक गोरख दिवे, रामचंद्र ढगे, भीमराव बेल्हाळे, युवराज गिरी, संजय कांबळे, महेश पारडे, गोविंद चामे, अभिमन्यू सोनटक्के, बालाजी कोतवाड, बळवंत भोसले, प्रशांत ओगले, विनोद चालवाड, काकासाहेब बोचरे, अमित लहाने यांच्या पथकाने केली आहे. तपास पोउपनि. पोगुलवार, अमलदार धैर्यशील मुळे करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीThiefचोरPoliceपोलिस