अहमदपूर (जि.लातूर) : वाळूची वाहतूक करणारा टिप्पर नदी पात्रात काेसळल्याने चालक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातात टिप्परमध्ये असलेला अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात घटनेची नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर नांदेड रोडवर असलेल्या सुनेगाव सांगवी येथील मन्याड नदीच्या पुलावरून वाळूची वाहतूक करणारा टिप्पर (एम.एच.२६ बी. ८०८०) लोह्याकडून अहमदपूरकडे येत हाेता. दरम्यान, मन्याड नदीच्या पुलावरून ताे आल्यानंतर नदीपत्रात कोसळला. या अपघातात चालक हनुमंत रावसाहेब ढवळे (वय ३५, रा.दगडगाव ता.लोहा जि.नांदेड) हा जागीच ठार झाला, तर टिप्परमध्ये साेबत असलेला आनंद सुभाष गोडबोले (रा.जवळा ता.लोहा, जि.नांदेड) हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपास अहमदपूर पोलिस करीत आहेत.