शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन; गेल्या तीन पिढ्यांपासून साजरा करतात एकत्र मोहरम सण

By संदीप शिंदे | Published: July 17, 2024 6:36 PM

मोहरम सणानिमित्ताने उभारण्यात आलेल्या डोल्याची गावभरात मोठ्या उत्साहात वाजत गाजत मिरवणूक काढली जाते

निलंगा : तालुक्यातील मसलगा येथे मोहरम सण बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या तीन पिढ्यांपासून येथील हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र येऊन मोहरम सण उत्साहात साजरा करतात. सणांमध्ये डोल्याचे विशेष आकर्षण गावकऱ्यांना असते. त्यामुळे गावातील सर्वधर्मीय नागरिक स्वयंस्फूर्तीने या सणानिमित्ताने एकत्र येतात. एकमेकांशी संवाद साधतात, परिणामी, गावामध्ये हिंदू मुस्लिम बांधवाचे एकतेचे दर्शन पहावयास मिळते.

हा डोलाची परिसरातील नागरिकांना विशेष आकर्षण असते. १० जुलै रोजी बसवण्यात आलेल्या सवारीची बुधवारी सांगता करण्यात आली. मोहरम सणानिमित्ताने उभारण्यात आलेल्या डोल्याची गावभरात मोठ्या उत्साहात वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. खांद्यावरती डोला घेऊन वाद्याच्या तालात गावभरातून मिरवणूक काढण्यात येते. विशेष म्हणजे मिरवणुकीमध्ये गावातील सर्व धर्मातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील सुलतान सय्यद, दस्तगीर शेख बालाजी पिंड, नागनाथ नरहरे, शिवाजी पवार, हनुमंत पिंड गुरुनाथ पिंड, चंद्र पवार, राजेश पिंड, गोविंद पवार, तानाजी शिंदे, गफूर सय्यद, प्रभू जाधव, गोविंद शिंदे, ओम पाटील, जयपाल सलघंटे, ओमकार पवार, नामदेव चामे, सुभाष जाधव राम बनसोडे आदींसह गावातील नागरिक एकत्र येत डोल्याची विशेष बांधणी करतात. वादक म्हणून उत्तम शिंदे व हरी शिंदे हे उपस्थित होते.

आठ दिवस डोला बनविण्याचे काम...मोहरम सण तोंडावर येताच डोल्याच्या विशेष बांधणीसाठी कपडा, दोरा, जर, आरशे, बिलवरहंडी आधी साहित्य पासून कलाकुसरणी अतिशय साचेबद्ध पद्धतीने कापडी सजावटीसह डोला बनवण्यात येतो. हे काम जवळपास आठवडाभर चालत असते. मोहरम सणानिमित्ताने उभारण्यात आलेल्या डोल्याची उत्साहात मिरवणूक काढत खांद्यावरती डोला घेऊन वाद्याच्या तालात गावभरातून मिरवणूक काढण्यात येत असून, यामध्ये नागरिक सहभागी होतात.

टॅग्स :laturलातूरHinduहिंदूMuslimमुस्लीम