लातूर : आठवडाभराच्या सुट्टीनंतर सोमवारी शहरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाचा सौदा निघाला. शेतीमालाची आवक अन् दर स्थिर असल्याचे पहावयास मिळाले. नगदी पीक असलेल्या सोयाबीनला ४ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
गत खरीपात अल्प पर्जन्यमानामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आगामी काळात चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा लागून होती. परंतु, सातत्याने दरात घसरण होत आहे. आधारभूत किंमतीपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. सध्या रबी हंगामातील हरभऱ्याच्या राशी झाल्या असून बाजारात बऱ्यापैकी आवक होत आहे. दरम्यान, होळीनिमित्ताने २४ मार्च रोजी बाजार समितीस सुट्टी होती. २५ रोजी धुलीवंदनाची सुटी राहिली तर २६ ते २८ मार्च दरम्यान, आडत, व्यापारी आणि हमाल मापाडींनी एकत्रित येऊन सुटी घेतली. २९ रोजी गुड फ्रायडे, ३० रोजी रंगपंचमीची तर ३१ मार्च रोजी रविवारी सुटी राहिली. त्यामुळे सोमवारी बाजारपेठ पूर्ववत सुरु झाली.
शेतमाल - आवक - साधारण दरगहू - १५१ - २९००हायब्रीड - ५९ - २३००ज्वारी - ४६४ - ३४००पिवळी - १५३ - ३९००हरभरा - ६१६२ - ५६००तूर - २३१८ - १०३००करडई - २६६ - ४३१०सोयाबीन - १३७९७ - ४५५०चिंच - ८८३ - ९०००राजमा - ११३ - ९१००