उदगीर : तालुक्यातील कुमठा (खु.) येथील एका २८ वर्षीय युवकाने शुक्रवारी दुपारी कुमठा शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नामदेव गोविंद केंद्रे असे मयत युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील कुमठा (खु़ ) येथील नामदेव केंद्रे (वय २८) याने शुक्रवारी दुपारी बारा वाजण्यापूर्वी आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात कृष्णा गोपाळ केंद्रे यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड काॅन्स्टेबल भिसे करीत आहेत.