विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत १७८ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १६१ निगेटीव्ह तर १५ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर ३६८ जणांची रॅपिड ॲन्टीजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ३३८ निगेटीव्ह तर ३० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. रॅपिड आणि प्रयोगशाळेतील चाचणी असे दोन्ही मिळून ४५ नव्या बाधित रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात सध्या ३७८ जणांवर उपचार सुरु असून, त्यापैकी १३७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३५ टक्क्यांवर पोहचले असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ५३६ दिवसांवर पोहचला आहे. तर मृत्यूचा दर २.९ टक्क्यांवर असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. एस.एस. देशमुख यांनी सांगितले.
३९ जणांची कोरोनावर मात...
बुधवारी ३९ रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुटी देण्यात आली. त्यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २, समाज कल्याण वसतीगृह, कव्हा रोड लातूर येथील १४, खाजगी रुग्णालय ७ तर होमआयसोलेशनमधील १६ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असला तरी बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्यांवर अधिक भर दिला जात असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.