...
१३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती
चाकूर : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यासाठी १३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी दिली. तालुक्यातील एकूण ८१ प्रभागातून २१६ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याचे तहसीलदार डॉ. बिडवे यांनी सांगितले.
...
कोराळीत महिलांना शिलाई मशीन वाटप
निलंगा : निलंगा तालुक्यातील कोराळी येथील गरजू महिलांना बडूर पंचायत समिती सदस्य गोकर्णा पाटील यांच्या प्रयत्नातून ३० शिलाई मशीन व दोन पीठ गिरणीचे वाटप करण्यात आले. गरजू महिलांना सक्षम बनविण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी माजी सरपंच चंद्रकांत पाटील, समदसाब मुजावर, करिबसवेश्वर पाटील, सिध्देश्वर खंडाळे, शिवपुत्र बिराजदार आदी उपस्थित होते.
...
जिल्हाधिकाऱ्यांनी केली तूर पिकाची पाहणी
नळेगाव : वातावरणातील बदलामुळे तूर पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिकाची पानगळ झाली आहे. महाळंग्रा, आष्टा शिवारातील या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी केली. यावेळी तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, कृषी संचालक विकास पाटील, विभागीय कृषी सहसंचालक टी.एन. जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, अरुण गुट्टे, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे विशेष तज्ज्ञ संदीप देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी महेश तीर्थकर, आय.एस. कदम, तालुका कृषी अधिकारी भुजंग पवार उपस्थित होते.
...
लोहारा येथे धम्म परिषद उत्साहात
उदगीर : भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने लोहारा येथे वर्षावास समारोप व चौथी धम्म परिषद पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी भदन्त नागसेन बोधी, भदन्त कश्यप यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रमेश मोमले, दयानंद सोनटक्के, विजयकुमार कांबळे, अनिल कांबळे, मच्छिंद्रनाथ बलांडे, जितेंद्र गायकवाड, माधव कांबळे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.