शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

राशी झाल्यानंतर शेतमाल थेट बाजारात; लातूरात सोयाबीनची विक्रमी आवक

By हरी मोकाशे | Published: November 04, 2023 7:03 PM

दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला विक्रमी ११ हजार रुपयांपेक्षा अधिकचा भाव मिळाला होता.

लातूर : जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीनच्या पिकाच्या राशी होताच शेतकरी थेट शेतमालाला बाजारपेठ दाखवित आहेत. त्यामुळे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे. शनिवारी ५२ हजार ३४७ क्विंटल अशी आवक झाली. दरम्यान, आवक वाढूनही दर मात्र स्थिर राहिल्याचे पहावयास मिळाले.

जिल्ह्यात सोयाबीनवर प्रक्रिया करणारे मोठमोठे उद्योग असल्याने येथे सोयाबीन मोठी आवक होते. खरीपात ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. मात्र, फुल- फळ धारणेच्या कालावधीत पावसाने ताण दिला आहे. तसेच येल्लो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादनात जवळपास ६० टक्क्यांची घट झाली. तीन आठवड्यांपासून शेतकरी सोयाबीनच्या राशी करीत आहेत. आर्थिक अडचणींतील शेतकरी हाती चार पैसे असावेत म्हणून सोयाबीन थेट बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहेत.

एका दिवसात आवक दुप्पटमागील १५ दिवसांपासून बाजार समितीत सोयाबीनची आवक सुरू होती. मात्र, ती २० हजार क्विंटलच्या जवळपास होती. शुक्रवारी आवक वाढून २९ हजार ४३६ क्विंटल झाली, तर शनिवारी जवळपास दुप्पट आवक झाली. दिवसभरात ५२ हजार ३४७ क्विंटल झाली. त्यामुळे आडत बाजारात जिकडे- तिकडे सोयाबीनचे कट्टे दिसून येत आहेत.

सर्वसाधारण दर ४ हजार ७७० रुपयेशनिवारी सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर घसरतील की काय अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत होती. मात्र, दर स्थिर राहिल्याने बळीराजास काहीसा दिलासा मिळाला. कमाल भाव ४ हजार ८५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला. किमान ४ हजार ७०० रुपये तर सर्वसाधारण दर ४ हजार ७७० रुपये मिळाला. शुक्रवारी कमाल भाव ४ हजार ८४५, किमान ४६०० तर सर्वसाधारण ४ हजार ७६० रुपये राहिला होता.

किमान दरात शंभर रुपयांची वाढआवक वाढली की दर घसरतात, असा शेतकऱ्यांना नेहमीचा अनुभव आहे. शनिवारी आवक दुप्पट होऊनही किमान दरात शंभर रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले. सोयाबीन घेऊन आलेल्या वाहनांच्या मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वाराजवळ रांगाच रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत मापतोल करणे सुरू होते.

गेल्या वर्षीचेही सोयाबीन बाजारातदोन वर्षांपूर्वी सोयाबीनला विक्रमी ११ हजार रुपयांपेक्षा अधिकचा भाव मिळाला होता. मात्र, गत हंगामात कमी दर असल्याने आगामी चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री केली नाही. परंतु, सतत भाव घसरत असल्याने आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी आता सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत.

व्यापाऱ्यांना सूचनाकुठल्याही शेतकऱ्याची अडचण होऊ नये याची व्यापाऱ्यांनी दक्षता घ्यावी. वेळेवर मापतोल करावेत. दीपावलीचा सण काही दिवसांवर आल्याने शेतमालाची पट्टी विनाविलंब द्यावी, अशा सूचना व्यापाऱ्यांना केल्या आहेत.- जगदीश बावणे, सभापती, बाजार समिती.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डlaturलातूरFarmerशेतकरी