राजकुमार जाेंधळे
लातूर : मानसिक स्थिती बरी नसलेले घर साेडून भटकत या गावाहून त्या गावाला फिरतात आणि त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क तुटताे. अशा स्थितीत त्यांना कुठलाच आधार मिळत नाही. अशा बेघर आणि मानसिक स्थित बरी नसलेल्या रुग्णांना, व्यक्तीला लातुरातील दिव्य सेवा संकल्प संस्थेच्या काही सदस्यांनी मानसिक आधार देत त्यांच्यावर यशस्वी उपचार केले आहेत. यातून काही जणांना आपल्या कुटुंबीयांची आठवण झाली, त्यांनी स्वत:लाच ओळखायला सुरुवात केले.
मुरुडमध्ये बेघर भटकणाऱ्या रेखालाही याच युवकांनी आधार दिला. वर्षभराच्या उपचारानंतर ती आपल्या बेळगावातील घरी जात आहे. लातुरातील सुभाष चाैकात आढळलेला दशरथ दहा वर्षांनी बरा होऊन ताे रागयड येथे आपल्या घरी जात आहे. याचा आनंद तिच्या अन् तिला मानसिक आधार देणाऱ्या दिव्यसेवा संकल्प संस्थेच्या युवकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचा विषय गंभीर आहे. याकडे संबंधित यंत्रणा आणि समाजाचेही दुर्लक्ष हाेत आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी ‘स्वच्छ भारत मिशन’मध्ये त्यांच्या उपचार आणि इतर याेजना समाविष्ट कराव्या, अशी माणगी लातुरातील युवकांनी केली आहे. या कार्याला माेठे स्वरूप प्राप्त हाेईल. यासाठी संस्थेकडून कर्मा ॲप सुरू करण्यात येणार आहे. समाजात आढळणाऱ्या मनोरुग्णांना काही प्रमाणात वेळेवर मानसिक आधार देत उपचार केले तर ते नक्कीच बरे हाेतात. हा अनुभव लातुरातील विधायक काम करणाऱ्या युवकांना आला आहे. यासाठी दिव्य सेवा संकल्पचे अशोक काकडे यांनी पुढाकार घेतला. त्याचबरोबर लातुरातील असिफ पठाण, आकाश गायकवाड, सयद मुस्तफा, गोपाळ ओझा यांनीही अधिक धडपड केली आहे.