लातूर : केंद्रप्रमुखांची पदोन्नती तत्काळ करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, सेवानिवृत्तांची प्रकरणे लवकर निकाली काढावी, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शनिवारी दुपारी २ ते ५ या कालावधीत जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाद्वारे अशैक्षणिक कामे बंद करून शिक्षकांना शिकवू द्या, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा, तिसरा, चौथा हप्ता देण्यात यावा, शिक्षकांच्या पगारी दरमहा १ तारखेला कराव्यात, शिक्षकांची नवीन पदे तातडीने भरावीत, पदवीधरांची पदोन्नती करावी, पदवीधरातून पदोन्नतीने मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख झाल्यानंतर याेग्य वेतनवाढ देण्याचे निश्चित करावे, ३० जून रोजी निवृत्त झालेल्या शिक्षकांना १ जुलैची वेतनवाढ द्यावी, कमी पटाच्या शाळा बंद करू नये आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आंदाेलनात राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे चंद्रकांत भोजने, अरुण साळुंके, मराठवाडा प्रमुख संजय सूर्यवंशी, किशनराव बिरादार, विकास पुरी, माधवराव फावडे, भरत पुंड, कुलदीप पाटील, नजीर मुजावर, रणजित चौधरी, मनोज मुंडे आदींसह शिक्षकांचा सहभाग होता.यावेळी मागण्यांचे निवदेन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री यांना पाठविण्यात आले.