अध्यक्षस्थानी उपसभापती प्रकाश उफाडे होते. मंचावर सदस्य शेटे, प्रताप पाटील, गटविकास अधिकारी गोडभरले, तालुका कृषी अधिकारी महेश क्षीरसागर यांची उपस्थिती होती.
तसेच रब्बी हंगाम २०२० मध्ये पीक स्पर्धा विजेते शेतकऱ्यांना प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. यावर्षी गट प्रात्यक्षिक अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना बियाणे देण्यात आले आहेत त्या शेतकऱ्यांच्या सतत संपर्कात राहून सोयाबीनचे उत्पन्न, सोयाबीन बियाणे म्हणून कसे करता येईल याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करावे जेणेकरून पुढील वर्षी जातिवंत शुद्ध बियाणे शेतकऱ्यांना घरच्या घरी उपलब्ध होईल आणि त्यांच्या उत्पादन खर्चामध्ये बचत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी उफाडे म्हणाले, पीक स्पर्धेतील विजेत्यांनी ज्या पद्धतीने विक्रमी उत्पादन घेतले, त्याचे इतरांनी अनुकरण करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी जयस्वाल यांनी केले. कृषी अधिकारी अरद्राड यांनी आभार मानले.
यावेळी कृषी अधिकारी मुक्तापुरे, वाय. एल. जाधव, विस्तार अधिकारी शिंदे, यशवंत दहिफळे आदींची उपस्थिती होती.