जळकोट येथील शाळेत बुधवारी १०६ जणांची ॲन्टीजन तर ३४ जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्क्षण्कांयात आली. यात एकही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे भितीचे कारण नाही. आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी वेळीच लक्ष घालून शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे. मास्कचा वापर करावा शारीरिक अंतर पाळावे अशा विविध सूचना दिल्या. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.जगदीश सूर्यवंशी, ,डॉ.सतिष हरिदास, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, डॉ. खंडागळे, डॉ. कदम यांची उपस्थिती होती. तसेच विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान चाचणीत कोणीच पॉझिटिव्ह आले नसल्याने पालकांनी आनंद व्यक्त केला.
जळकोटच्या त्या शाळेतील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:35 AM