याबाबत ग्रामीण पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, एनओ सीपीएल ही संस्था महिला बचत गटास कर्ज देते .कर्ज वसुलीसाठी राजकुमार ज्ञानोबा केंद्रे रा . पिंपरी ता. उदगीर याला नेमले होते . २० मे २०२० ते २९ नोव्हेंबर २०२० या काळात वसुलीसाठी असलेले राजकुमार केंद्रे यांनी ६० हजार ९०५ रक्कम वेगवेगळ्या गावातून महिला बचत गटाचे कर्जदार यांच्याकडून वसूल केली. परंतु ती रक्कम संस्थेत न भरता परस्पर अफरातफर केली व संस्थेच्या शाखेत येऊन इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली . अशी तक्रार फिर्यादी प्रशांत संगप्पा पट्टणशेट्टी यांनी दिल्यामुळे उदगीरच्या ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये राजकुमार ज्ञानोबा केंद्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
बचत गटाची रक्कम परस्पर अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:35 AM