राजकुमार जाेंधळे / लातूर : घरफाेडीच्या गुन्ह्यातील एका आराेपीला रविवारी मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई औसा ठाण्याच्या पाेलिस पथकाने केली.
पाेलिसांनी सांगितले की, औसा पाेलिस ठाण्याच्या हद्दीत घराचा कडी-कोयंडा तोडून स्कुटी, मोबाइल, सोन्याचे झुमके आणि राेकड पळविल्याची घटना घडली होती. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी यातील आराेपीचा शाेध घेण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली औशाचे पोलिस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाने आराेपीचा शाेध सुरू केला. याबाबत खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटली. त्याला राहत्या ठिकाणाहून अटक करण्यात आली. चाैकशी केली असता, त्याने साहिल महबूब सय्यद (वय २२, रा. टेंभी, ता. औसा) असे नाव सांगितले.
दाेन गुन्ह्यांचा झाला उलगडा...
घरफाेडी केल्याची कबुली त्याने पाेलिसांकडे दिली असून, चोरलेल्या मुद्देमालापैकी स्कुटी, मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय, विवेकानंद चौक ठाण्याच्या हद्दीतूनही एक मोबाइल चोरल्याचे त्याने सांगितले. ही कारवाई सहायक पोलिस उपनिरीक्षक कांबळे, अमलदार भुरे, पाटील, गोमारे यांच्या पथकाने केली.