निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, शहराध्यक्ष गणेशराव फुलारी, पंचायत समिती सदस्य हरिभाऊ काळे, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य गणेश शिंदाळकर, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष समाधान जाधव, सुरेंद्र सावंत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. पेट्रोलने शंभरी पार केली आहे. त्यातच केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे. १०-२६-२६ ची किंमत ६०० रुपयांनी वाढली आहे. डीएपीची किंमत ७१५ रुपयांनी वाढविली आहे. पूर्वी डीएपी ११८५ रुपयांना मिळत होते. आता ते १९०० रुपयांना झाले आहे, तसेच पोटॅशच्या किमतीही वाढविल्या आहेत. देशातील खतांच्या किमतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अगोदरच कोरोनामुळे देशातील शेतकरी संकटात आहे. केंद्र सरकारने दर कमी करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
पेट्रोल, खताच्या दरवाढीमुळे केंद्र सरकारवर संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:19 AM