जिजामाता संकुलात अभिवादन कार्यक्रम
लातूर : जिजामाता विद्यासंकुलात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्या सलिमा सय्यद यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. यावेळी नगरसेवक इम्रान सय्यद, डॉ. पवन लड्डा, विशाल राठी, प्रा. बाळासाहेब बावणे, प्रा. बाबासाहेब सोनवणे, मुख्याध्यापिका साविजेता खंदारे आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
माळी सेवा संघाच्या वतीने अभिवादन
लातूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती माळी सेवा संघाच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी भारत काळे, पद्माकर वाघमारे, श्रावण उगले, यादव, पांडुरंग माळी, उगले, राऊत, पोलकर, सुदाम राऊत, धोंडिबा कोकणे, गोपाळ बदाडे, बळीराम सोनवणे, शैलेश काळे यांची उपस्थिती होती. राज्य सरचिटणीस भारत काळे यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याविषयी माहिती दिली.
व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
लातूर : समाजकल्याण विभाग जिल्हा परिषदेच्या वतीने दिव्यांगांकरिता अल्पमुदत व्यावसायिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पेपर बॅग, द्रोण पत्रावळी, लोणचे तयार करणे, नूडल्स बनविणे, झाडू बनविणे, मेणबत्ती बनविणे आदी व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. २६ फेब्रुवारी नोंदणी करण्याची अंतिम मुदत असून, तालुकास्तरावरील गटविकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवजयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन
लातूर : एमआयडीसी परिसरातील एक नंबर चौक येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी विनोद गुंडरे यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्यावर व्याख्यान दिले. कार्यक्रमास पारस खोसे, ॲड. राजेश खटके, ॲड. जितेंद्र कांबळे, शैलेश भोसले, कैलास जगताप, भगवान माकणे, हेमंत जाधव, शिवलिंग स्वामी, संदीप डोंगरे, बळीराम पाटील, अनुप मलवाड, मनोज डोंगरे, रोहित वडरुले यांची उपस्थिती होती.
संजय गांधी निराधार योजनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
लातूर : संजय गांधी निराधार योजनेच्या नूतन अध्यक्ष व सदस्यांचा आ. धीरज देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी योजना समितीचे लातूर तालुकाध्यक्ष प्रवीण हणमंतराव पाटील, अमोल देडे, शीतल सोनवणे, धनंजय वैद्य, हरीश बोळंगे, अमोल भिसे, संजय चव्हाण, परमेश्वर पवार, रमेश पाटी, आकाश कणसे यांची उपस्थिती होती. लातूर तालुक्यातील दुर्बल, वंचित, निराधार व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन आ. धीरज देशमुख यांनी केले.