दरम्यान, १७७५ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील १२७३, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३, सामान्य रुग्णालय उदगीर येथील ४, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील ९, कोविड केअर सेंटर उदगीर येथील १६, तोंडार पाटी येथील १५, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील २०५, मरशिवणी कोविड केअर सेंटरमधील ६, मुलींची शासकीय निवासी शाळा औसा येथील १३, शासकीय वसतिगृह न्यू बिल्डिंग देवणी येथील ५, कृषी पीजी कॉलेज चाकूर येथील २४, बावची कोविड सेंटरमधील १२, लाहोटी तंत्रनिकेतनमधील ५९, समाजकल्याण हॉस्टेल कव्हा रोड येथील ३७, अशा एकूण १७७५ रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली.
रुग्ण दुपटीचा कालावधी २४ दिवसांवर
रुग्ण दुप्पट दिवसाचा कालावधी कमी दिवसांवर आला आहे. ७०० दिवसांवर रुग्ण दुपटीचा कालावधी गेला होता. मात्र, मार्च महिन्यापासून रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी २४ दिवसांवर गेला आहे, तर बरे होण्याचे प्रमाण ७३ टक्के असून, मृत्यूचे प्रमाण १.७ टक्के आहे.