शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
3
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
4
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
6
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
7
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
8
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
9
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
11
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
12
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
13
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
14
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
15
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
16
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
17
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
18
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
19
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
20
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात

लातूर जिल्ह्यातील आणखीन एक मध्यम प्रकल्प काेरडा; ५०१ गावांमध्ये ठणठणाट!

By हरी मोकाशे | Published: May 30, 2024 4:42 PM

उन्हामुळे टंचाई वाढली : ३९८ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

लातूर : वैशाख वणव्यामुळे होरपळ वाढली आहे. त्याचबरोबर जलसाठ्यातही झपाट्याने घट होत आहे. दरम्यान, आणखीन एक मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेल्याने त्यावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये टंचाईची दाहकता वाढली आहे. सध्या जिल्ह्यातील ५०१ गावांना टंचाईचे चटके बसत आहे. त्यापैकी ३९८ गावांना ४८५ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अल्प पर्जन्यमान झाल्याने प्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे जलसाठे आटू लागले आहेत. तसेच जलस्त्रोतही कोरडे पडत आहेत. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांपैकी तीन मध्यम प्रकल्प यापूर्वीच जोत्याखाली गेले होते. दरम्यान आता आणखीन एक मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेल्याने पाणीटंचाई वाढली आहे.

चार प्रकल्पांत उपयुक्त पाणी शून्य...जिल्ह्यातील तावरजा, व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्प यापूर्वीच जोत्याखाली गेले आहेेत. त्यामुळे तिथे उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. वाढत्या उन्हामुळे आता शिरुर अनंतपाळ तालुक्यातील घरणी मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेला आहे. त्यामुळे तिथेही उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. सध्या रेणापूर प्रकल्पात ०.५७० दलघमी, देवर्जन- ०.३९९, साकोळ- ०.४९० आणि मसलगा मध्यम प्रकल्पात १.८२५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. चार मध्यम प्रकल्पात एकूण ३.२८४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे.

चार प्रकल्पांमध्ये २.६९ टक्के साठा...प्रकल्प - पाणी (टक्के)तावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - १.७०तिरु - ००देवर्जन - ३.७४साकोळ - ४.४८घरणी - ००मसलगा - १३.४२एकूण - २.६९

लघु तलावांमध्ये ६.८६ टक्के साठा...लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत जिल्ह्यात एकूण १३४ तलाव आहेत. त्यात सध्या २१.५७४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. तो ६.८६ टक्के आहे. दरम्यान, सततच्या वाढत्या उन्हामुळे तलावातील साठ्यात झपाट्याने घट होत आहे.

टंचाई निवारणासाठी ४८५ अधिग्रहणे...सध्या जिल्ह्यातील ४२२ गावे आणि ७९ वाड्या अशा एकूण ५०१ गावांना पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे या गावांनी टंचाई निवारणासाठी ७३४ प्रस्ताव दाखल केले आहेत. पंचायत समितीने प्रत्यक्ष पाहणीनंतर २७ गावांचे प्रस्ताव वगळले आहेत. ४५८ गावांचे ५९९ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर केले. त्यातील ३९८ गावांसाठी ४८५ अधिग्रहणे मंजूर करण्यात येऊन पाणीपुरवठा सुरु आहे.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर