शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

लातूरमध्ये अँटीरेबीज लसीकरणाची मोहीम बारगळली?  भ्रमणध्वनीवर प्रतिसाद मिळेना

By हणमंत गायकवाड | Published: March 20, 2024 4:36 PM

लातूर शहरामध्ये भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

लातूर: भटक्या श्वानांचा त्रास कमी करण्यासाठी महानगरपालिका आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन च्या सहकार्याने अँटीरेबीज लसीकरण मोहीम सुरू केल्याचा गाजावाजा करण्यात आला. नागरिकांना संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. परंतु त्यावर वारंवार कॉल करूनही संबंधित यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नाही. किंबहुना भ्रमणध्वनीच उचलला जात नाही. मग अँटीरेबीज लसीकरणाची मोहीम कुठे चालू आहे,असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

लातूर शहरामध्ये भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. रात्रीच्या वेळी या श्वानांची टोळी रस्त्याने फिरत असते. रस्त्याने ही टोळी फिरत असताना यावेळी दुचाकी आली तर तिचा पाठलाग श्वान करतात. यामुळे दुचाकीस्वार घाबरून दुचाकीची स्पीड वाढवितो. परिणामी,अपघात होऊन गंभीर जखमी होण्याच्या घटना शहरात सातत्याने घडत आहेत. वृद्ध नागरिक, महिला, पुरुष तसेच शाळकरी मुलांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे अनेक उदाहरणे आहेत. याला आवर घालण्यासाठी महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभाग आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने अँटीरेबीज लसीकरणाची मोहीम सुरू केल्याचे म्हटले आहे. मात्र त्यांनी जाहीर केलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला तर प्रतिसाद मिळत नाही. फोन उचलला जात नाही, त्यामुळे भटक्या श्वानांची माहिती कोणाला द्यायची असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

८६५५३२३१६८ या क्रमांकावर संपर्क साधला तर कोणीही उचलेना ! महानगरपालिका आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने भटक्या श्वानांची माहिती देण्यासाठी ८६५५३२३१६८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार संपर्क साधला तरी हा मोबाईल उचलला जात नाही. दरम्यान, ७३८५२२६८८८, ७७२०९७ ०५०६ व ८६६८७६९८२७ या क्रमांकाच्या भ्रमणध्वनीवरून भटक्या श्वानांची माहिती देण्यासाठी वारंवार प्रस्तुत भ्रमणध्वनीवर संपर्क साधला, परंतु भ्रमणध्वनी उचलला नाही. मग संपर्क साधण्याचे आवाहन कशासाठी? लातूर शहरातील प्रभागात जाऊन भटक्या श्वनांना लस दिली जात असल्याचे सांगण्यात आले असले तरी फोन उचलला जात नाही. दर शनिवारी त्या त्या परिसरात जाऊन अँटीरेबीज लसीकरण करणे महानगरपालिकेचा मनोदय आहे. त्यासाठी नागरिकांनी आपल्या भागातील भटक्या श्वानांची माहिती या क्रमांकावर द्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे. 

वृद्ध नागरिक,लहान मुलांना भटक्या श्वानांचा त्रास वृद्ध नागरिक,लहानमुलेवमहिलांनाभटक्याश्वानांचात्रासआहे. अँटीरेबीज लसीकरण तसेच निर्बीजीकरणनुसताच फार्स करण्यात आलेलाआहे वास्तवातकामठप्पआहे. ज्यासंस्थेकडेहेकाम मनपाने सोपवले आहे. त्यासंस्थेवर मनपाचे नियंत्रण नाही. हे यावरून सिद्ध होत आहे.

टॅग्स :laturलातूरdogकुत्रा