शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

चिंता वाढली! पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही पाणी साठवण प्रकल्प कोरडेठाक

By संदीप शिंदे | Published: August 12, 2023 5:44 PM

दमदार पावसाची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षाच

अहमदपूर : पावसाळा सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी होत आला असला तरी तालुक्यातील बहुतांश भागात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे १० प्रकल्प कोरडेठाक पडले असून, उर्वरित प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा आहे. त्यामुळे लघु, मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी तालुक्यातील नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

अहमदपूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाणलोट क्षेत्रातील लहान, मोठे प्रकल्प तहानलेले आहेत. पावसाअभावी तालुक्यातील १० प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे अनेक गावांना भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. तालुक्यातील मोघा ८.८७ टक्के, थोडगा ५.७० टक्के, सावरगाव थोट ०.९२, तांबटसांगवी १. ७३ टक्के, मावलगाव ००, खंडाळी ०.३२, हगदळ / गुगदळ २.८५, नागझरी ३.५८, सोनखेड १९.४१, धसवाडी ५.९३, अंधोरी ०० टक्के, ढाळेगाव ५.२८, येस्तार ४.६७, मोळवण १९.१४,

कावळवाडी १६.४६, हंगेवाडी ९.०५, येलदरी १०.७७, कोपरा, भुतेकरवाडी ०० टक्के, नागठाणा १३.८, उगीलेवाडी ००, पाटोदा ४५.७, गोताळा ००, काळेगाव १०.५८, अहमदपूर साठवण तलाव, वाकी तलाव, तेलगाव आणि कौडगाव साठवण तलावात शून्य टक्के पाणीसाठा आहे. तालुक्यात २८ लघु, मध्यम प्रकल्प व साठवण तलाव असून, प्रकल्पात चांगला पाणीसाठा होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

मागील वर्षी अनेक प्रकल्पातून विसर्ग...मागीलवर्षी प्रकल्पाच्या क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वच प्रकल्प तुडुंब भरले होते. अनेक प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बीच्या क्षेत्रातदेखील वाढ झाली होती. परंतु, यावर्षी जून, जुलै व अर्धा ऑगस्ट महिना असूनही पावसाने अहमदपूर तालुक्यात अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला नाही. रब्बीसाठी तालुक्यातील प्रकल्प भरणे आवश्यक आहे. लघु, मध्यम प्रकल्पात पाणीसाठा झाला तरच रब्बी हंगामासाठी मदत होणार आहे.

तालुक्यातील नद्या, नाले अद्यापही कोरडेठाक...सध्या तालुक्यातील नद्या-नाले कोरडेठाक असून, या पावसामुळे त्यांची तहान भागलेली नाही. सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मका व इतर पिकांवर शेतकऱ्यांची मदार असताना यावर्षी मृग नक्षत्रात पावसाचे आगमन झाले. मात्र, आतापर्यंत हा पाऊस रिमझिम पडत असल्याने नदी-नाले कोरडेठाक आहेत. दोन महिने संपले तरी परिसरात मुसळधार पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे परिसरातील नद्या ,नाले अजून एकदाही वाहिले नाहीत. परिणामी, विहिरी अजूनही कोरड्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात काम करायला जाताना घरून पाणी घेऊन जावे लागत आहे.

टॅग्स :WaterपाणीlaturलातूरFarmerशेतकरी