सदरील प्राप्त होणारे औषधीचे कोणत्याही परिस्थितीत विना परवानगी परस्पर ग्राहकास किंवा किरकोळ मेडिकल शॉप्स यांना विक्री करता येणार नाही. या बाबींचे सनियंत्रण करण्यासाठी जिल्हा शल्यचिकिस्तक लातूर यांची नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. सदरील इंजेक्शनची विक्री करणाऱ्या घाऊक. ठोक विक्रेत्याकडे उपलब्ध होणाऱ्या स्टॉकची दैनिक माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग लातूर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर यांना सादर करावी. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार, भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी असे आदेशात नमुद केले आहे.
औषध वितरणासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:19 AM