राजकुमार जाेंधळे / लातूर : औशातील एका बारमध्ये काम करणाऱ्या वेटरचा खून केल्याप्रकरणी लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी दाेषी आराेपीला साेमवारी सात वर्षांचा कारावास व पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनवली आहे.
औसा येथील विठ्ठल नगरमधील पॅराडाईज बार येथे आराेपी सैफ उर्फ सैफ अली शकिल शेख, अब्दुल माेईज उर्फ बंब्बू हे गेले हाेते. दरम्यान,मेटर म्हणून काम कारणारा विजयकुमार वसंत राठाेड याला जेवनासाठी बाहेरुन डबा पार्सल आणण्यास सांगितले. मात्र, त्याने नकार दिल्यानंतर सैफ शेख याने त्याच्या पॅन्टच्या खिशातील चाकू काढून विजयकुमारच्या पाेटावर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या विजयकुमाराचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात मयत विजयकुमारचे वडिल वसंत तुकाराम राठाेड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला.
तपासानंतर लातूर न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल दाखल करण्यात आले. या खुटल्याची सुनावणी लातूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षाच्या वतीने १४ साक्षीदारांची साक्ष नाेंदविण्यात आली. त्यात घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह इतर साक्षीदारांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. या खटल्यातील प्रमुख साक्षीदार सरकार पक्षाला फितूर झाला. न्यायालयात सादर केलेल्या पुरव्यात सीसीटीव्ही फुटेज, परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरुन आराेपी सैफ उर्फ सैफ अली शकील शेख याला सात वर्षाचा कारावास, ५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी अभियाेक्ता संताेष देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना तपासाधिकारी पाेनि. शंकर पटवारी, पैरवी अधिकारी सपाेउपनि. आर.टी. राठाेड, डी.आर. कदम, अॅड. एम.के. बिरीकर, दिलीप नागराळे यांनी सहकार्य केले.
फितूर साक्षीदारांना न्यायालयाच्या नाेटीसा...
खून खटल्यात सरकार पक्षाला फितूर झालेल्या साक्षीदारांना न्यायालयाने नाेटीसा बजवल्या आहेत. त्यांच्याविराेधात खाेटी साक्ष दिल्याप्रकरणी कारवाई का करु नये? अशी विचारणा नाेटीसीमध्ये केली आहे.