- राजकुमार जाेंधळेलोकमत न्यूज नेटवर्कलातूर : ३० सप्टेंबर २०२४ राेजी किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाला ३१ वर्षे पूर्ण हाेत आहेत. मात्र, आजही ‘किल्लारी’च्या आठवणी जाग्या आहेत. दरवर्षी गणेशाेत्सवात याची प्रकर्षाने जाणीव हाेते. गत ३१ वर्षांत मराठवाड्यासह परिसराला तब्बल १२५ भूकंपाचे धक्के बसले आहेत.
सन २०१८ ते २०२४ या सहा वर्षांच्या काळात मराठवाड्यातील काही गावांमध्ये भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाण वाढले आहे. काही गावांना साैम्य धक्के जाणवले आहेत.
२०२४ मध्ये एकही धक्का नाही...nलातूर जिल्ह्याला २०२२ मध्ये भूकंपाचे ११ धक्केnऑक्टाेबर २०२३ मध्ये भूकंपाचे चार धक्के बसले. n२०२४ मध्ये भूकंपाची एकही नाेंद झाली नाही.
१९९९ मध्ये बसले ११ धक्के...nसप्टेंबर १९९३ ते सप्टेंबर २०२४ या काळात लातूर परिसराला भूकंपाचे ४८ धक्के बसले. १९९९ मध्ये किल्लारीला ११ धक्के जाणवले. लातूर, धाराशिव, किल्लारी, लाेहारा, उमगरा, सास्तूर-माकणीला सर्वाधिक धक्के बसले.n१३ सप्टेंबर २०२८ राेजी ३.९ रिश्टर, २१ डिसेंबर २०२१ राेजी ३.९ आणि २.७ रिश्टरचे धक्के बसले, तर ७ ते २३ सप्टेंबर २०२२ मध्ये तीन साैम्य धक्के जाणवले.