लातूर : दिवाळीचा सण तोंडावर आल्यामुळे बाजारात जुन्या सोयाबीनची आवक वाढलेली आहे. तीन ते साडेतीन हजार क्विंटल दररोज होणारी आवक आता साडेसात हजारांवर गेली आहे. दर मात्र स्थिरच आहेत. सौद्यापेक्षा पोटलीचा दर कमी आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये सोमवारी गहू, रबी ज्वारी, हरभरा, तूर, मूग, उडीद, करडई आणि सोयाबीन आदी शेतमालाची आवक होती. त्यात सर्वाधिक ७५२१ क्विंटल सोयाबीनची आवक होती. सोयाबीनचा सर्वसाधारण दर ५०७० रुपये, कमाल दर ५२०९, तर किमान ४७०० रुपये प्रति क्विंटल होता. सौद्याचा दर ५०७० रुपये होता, तर पोटलीमध्ये ४९५० रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला दर मिळाला असल्याचे सोयाबीन विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.
अशी होती आवक...
शेतमाल आवक सर्वसाधारण दरगहू १०६ २७००रबी ज्वारी २०५ ३०००हरभरा २०० ४४५०तूर १९२ ७५००मूग ३८० ६८००उडीद १०६८ ७२३०करडई ५४ ४८००सोयाबीन ७५२१ ५०७०